Nashik: नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांना दाखवले काळे झेंडे; कांदा-टॉमेटो फेकत अडवला ताफा

आम्ही सरकारच्या धोरणांचा निषेध करतो. शेतकरी मरत आहेत. कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घ्या. टोमॅटोला योग्य किमान आधारभूत किंमत द्या, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

Ajit Pawar, Tomatoes & Onions (PC - Facebook Pixabay)

Nashik: नाशिकमधील शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ताफ्याला वेठीस धरले. याशिवाय अजित पवारांच्या ताफ्यावर कांदे (Onions) आणि टोमॅटो (Tomatoes) फेकून शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. पवार हे ओझर विमानतळावरून दिंडोरीकडे जात असताना संतप्त शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा ताफा अडवला.

काळे झेंडे फडकावत शेतकर्‍यांनी कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेण्याची आणि टोमॅटोला चांगला आधारभूत किंमत देण्याची मागणी केली. आम्ही सरकारच्या धोरणांचा निषेध करतो. शेतकरी मरत आहेत. कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घ्या. टोमॅटोला योग्य किमान आधारभूत किंमत द्या, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. (हेही वाचा - Priyanka Chaturvedi On BJP: सीबीआय, इन्कम टॅक्स आणि ईडी भाजपचे भागीदार, शिवसेना (UBT) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा हल्ला)

दरम्यान, या घटनेनंतर नजीकच्या कळवण येथील पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी अनेक आंदोलकांना घटनास्थळापासून दूर नेले. मे ऑगस्ट दरम्यान टोमॅटोच्या किमतीने 200 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, आता किरकोळ विक्रीचे दर आता बाजारानुसार 12 ते 18 रुपये प्रति किलो आहेत, ज्याचा उत्पादकांवर विपरीत परिणाम झाला आहे.

भाजीपाल्यावरील निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घाऊक व्यापार बंद ठेवून 13 दिवसांचा संप केला. सरकारने आश्वासन दिल्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी संप मागे घेण्यात आला. मात्र घाऊक व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना कारवाईसाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.