Farmer Suicide: मराठवाड्यात 2022 मध्ये 1,023 शेतकऱ्यांनी संपवले आयुष्य, शेतकरी आत्महत्या सामाजिक चिंतेचा विषय

त्याच्या आगोदरच्या वर्षी मराठवाड्यात 887 आत्महत्या झाल्या होत्या.

Farmer Suicide | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील मराठवाडा (Marathwada) विभागात सुमारे 1,023 fशेतकऱ्यांनी सन 2022 या वर्षात आत्महत्या केल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. त्याच्या आगोदरच्या वर्षी मराठवाड्यात 887 आत्महत्या झाल्या होत्या. प्रामुख्याने या आत्महत्या प्रकरणांमध्ये जालना, औरंगाबाद (Aurangabad), परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded), लातूर (Latur), उस्मानाबाद (Osmanabad) आणि बीड (Beed) जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, 2001 पासून आत्महत्या 10,431 शेतकर्‍यांपैकी 7,605 शेतकर्‍यांना सरकारी निकषांनुसार मदत मिळाली होत. इतक्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्येच्या कारणाबाबत सांगताना काही अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले की, काही वर्षांत या प्रदेशात दुष्काळसदृश परिस्थिती तर काही वर्षांत अतिवृष्टी झाली आहे, ज्यामुळे पीक उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. (हेही वाचा, Farmer Suicide in Parbhani: परतीच्या पावसाने सोयाबीनचं नुकसान झाल्याने 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या)

अधिकारी आणि कार्यरर्त्यंनी मराठवाड्यातील अडचणींचा पाढा वाचताना पुढे म्हटले की, या प्रदेशातील सिंचन नेटवर्कचाही पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांसाठी समुपदेशन केंद्र चालवणारे विनायक हेगाणा यांनी शेतकरी आत्महत्यांचे विश्लेषण करताना सूक्ष्म पातळीवर काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.ते म्हणाले, नीती शीर्षस्थानी तयार केली जात आहेत, परंतु जमिनीवर अंमलबजावणी सुधारली जाऊ शक. याआधी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या पण आता त्यात बदल झाला आहे.

शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याबातब विनायक हेगाणा म्हणाले, शेतकरी धोरणांमधील त्रुटी शोधणे आणि त्यांना अधिक चांगले बनवणे ही निरंतर प्रक्रिया असली पाहिजे. त्यावर काम करू शकणारा लोकांचा एक गट असावा.

महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “शेतकऱ्यांना अनेक कर्जमाफी देण्यात आली असली तरी (आत्महत्येचे) आकडे वाढत आहेत. जेव्हा आम्ही त्यांचे कर्ज माफ करतो, तेव्हा त्यांच्या पीक उत्पादनालाही चांगला परतावा मिळेल हेही पाहावे लागेल.