महाविकासआघाडी सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका

या भागात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत मिळायला हवी, असेही फडणवीस म्हणाले.

Former Chief Minister Devendra | (Photo Credits: Twitter/ANI)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) आणि या सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीवर जोरदार टीका केली आहे. ते कोल्हापूर येथे बोलत होते. या वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) सरकारने अधिवेशन पार पाडण्याची केवळ औपचारिकता दाखवली. मात्र, या अधिवेशनात सरकारने विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिले नाहीत, विधिमंडळ सदस्यांनी केलेल्या सूचनांवरही भाष्य केले नाही. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडालाही पानं पुसली. सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा ही मुख्यमंत्र्यांनी दिलेली अश्वासनंही केवळ घोषणा असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विद्यमान सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी ( Farm Loan Waiver) असल्याचा आरोपही फडणवीस यांनी या वेळी केला.

या वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकासआघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेचा फायदा सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार नाही. या भागात आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत मिळायला हवी, असेही फडणवीस म्हणाले. (हेही वाचा, राज्यातील गोरगरीबांसाठी 10 रुपयांमध्ये 'शिवभोजन योजना' सुरू करण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा)

महाविकासआघाडी सरकारकडे आम्ही ज्या वेळी राज्य सोपवले तेव्हा राज्याची अर्थव्यवस्था 15.8 टक्के होती. देशातील राज्यांना 26 टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते. सकल उत्पन्नाच्या तुलनेत राज्य्यावर 18 टक्के इतके कर्ज आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. हा आरोप खोटा आहे. उलट राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.