Fake Garlic Scam in Akola: खरा आणि बनावट लसूण कसा ओळखायचा ? जाणून घ्या टीप्स

सध्या लसणाचा भाव प्रति किलो 300 वरून 350 पर्यंत पोहचला आहे. किंमतीतील वाढीमुळे सध्या

Garlic (Photo Credits-Facebook)

Tips to Detect Fake Garlic:  महाराष्ट्रात अकोल्यात (Akola)  सिमेंटचे लसूण देऊन फसवणूक होत असल्याचे व्हिडिओ वायरल होत आहेत. लसणाचे भाव वाढत असल्याने काही विक्रेत्यांनी त्याच्या खाली लोकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. सध्या लसणाचा भाव प्रति किलो 300 वरून 350 पर्यंत पोहचला आहे. लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. लसणाचा वापर केल्याने शरीरात हृद्याचे आरोग्य सुधारते, शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. त्यामुळे त्याचा अनेक पदार्थांमध्ये हमखास वापर केला जातो. मात्र फसवणूकीच्या प्रकारांमुळे आता ग्राहकांनीच सजग होऊन खरेदी करणं आवश्यक आहे. मग लसूण घेताना तुमची फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे देखील पहा.

लसूण घेताना कोणती काळजी घ्याल?

  • लसूण घेताना त्याच्या बाहेरील आवरणावरून आणि वजनावरून अंदाज लावा. लसूण खरा असेल तर तो वजनाला हलका असेल. बनावटी लसूण सहाजिकच सिमेंट भरलं असल्याने जड असणार आहे. Video: तुम्ही सिमेंटपासून बनवलेले खोटे लसूण खाता आहात का? महाराष्ट्रात फसवणुकीचा पर्दाफाश, व्हिडिओ व्हायरल .
  • लसूण थोडा सोलून बघा. अस्सल लसणाच्या पाकळ्या सहज निघतात. बनावट लसणामध्ये पाकळ्या निघू शकत नाहीत. सोलणं देखील कठीण होईल.
  • लसणाचा वास हा तो खरा खोटा ओळखण्याची खरी निशाणी आहे. लसूण हा वासाला उग्र असतो. त्याचा सहज वास येईल.
  • लसणाचा रंग देखील त्याची ओळख पटवतो. खरा लसूण पांढर्‍या रंगात असतो पण त्याचा पांढरा रंग सगळीकडे सारखाच नसतो. बनावट लसूण हा परफेक्ट दिसण्यासाठी सर्वत्र पांढरा शुभ्र दिसेल.

बनावट लसूण सेवनाचे तोटे

बनावट लसूण खाल्ल्याने शरीरावर त्याचे परिणाम दिसू शकतील. बनावट लसूण हा नॉन एडिबल घटकांनी बनवला असेल त्यामुळे त्याच्यात सिमेंट असू शकते. सिमेंट पोटात गेल्यास पचनाचा त्रास होईल. बनावट रंगामुळेही त्रास होऊ शकतो. लसणाच्या सालींचा भास करण्यासाठी वापरण्यात आलेला रंग देखील त्रासदायक ठरू शकतो. बनावट लसूण खरेदी केल्याचं समजलं तर त्याचा वापर टाळा आणि संबंधित विक्रेत्याला त्याची विचारणा करा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now