Fact Check: सांगली येथील बाजारात प्लास्टिक अंडी विकली जात असल्याची माहिती खोटी, उष्णतेचा परिणाम

मात्र व्हायरल झालेली ही माहिती चुकीचे असल्याचे समोर आले आहे.

Eggs (Photo Credits-Twitter)

काही दिवसांपूर्वी सांगली (Sangli) येथील बाजारात प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याचे माहिती सर्वत्र पसरली होती. मात्र व्हायरल झालेली ही माहिती चुकीचे असल्याचे समोर आले आहे. तसेच अंडी ही प्लास्टिकची नसून ती उष्णतेमुळे अशा पद्धतीची झाली असल्याचे म्हटले आहे.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, मिरज तालुक्यातील बुधगाव परिसरात ज्ञानेश्वर नाव्याच्या व्यक्तीने बाजारातून अंडी खरेदी केली होती. तसेच घरी गेल्यावर ती अंडी उकडत टाकल्यास त्यामधून फेस येण्यास सुरुवात होऊन प्लास्टिक जळल्याचा वास येऊ लागला. या प्रकारामुळे अंडी बनावट असून प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याचा आरोप त्यांनी आरोप लगावला.

(सांगली मध्ये बाजारात विकली जातायत प्लास्टिकची अंडी? खरेदी करण्यापूर्वी घ्या अशी खबरदारी)

मात्र सध्या राज्यात गरमीचे वातावरण असल्याने त्याच्या उष्णतेचा परिणाम अंड्यावर झाला. तर उष्णतेमुळे अंड्यांच्या आतील भागातील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने ती वजनाने हलकी होतात. त्यामुळे अंडी उकडल्यास त्यामधील पिवळा भाग कडक आणि रबरासारखा दिसू लागतो. असे अन्न आणि औषध प्रशासनाने या अंड्यांची तपासणी केल्यानंतर त्याची माहिती दिली आहे.