EY Pune च्या 26 वर्षीय CA चा मृत्यू; कंपनीच्या कार्यपद्धतीने जीव घेतल्याचा दावा करत आईने केला Rajiv Memani यांना इमेल

केरळमधील EY पुणे इथे सीए असलेल्या Anna Sebastian Perayil ला ऑफिसचा ताण आणि जास्त कामामुळे जीव गमवला असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credits: Pixabay)

EY Pune Employee Death:  पुण्याच्या Ernst and Young या आघाडीच्या अकाऊंटिंग कंपनीमध्ये 26 वर्षीय महिला कर्मचारीचा 'कामाचा ताण असहय्य' होऊन मृत्यू झाल्याचा दावा तिच्या कुटुंबाने केला आहे. दरम्यान कामावर रूजू झाल्यानंतर 4 महिन्यातच तिला सारं असहय्य झालं होतं. Anna Sebastian Perayil असं या  मृत तरूणीचं नाव असून ही तरूणी केरळची असून ती पेशाने सीए होती. दरम्यान या तरूणीच्या आईने Anita Augustine, यांनी इमेल करत EY च्या भारतातील प्रमुख Rajiv Memani यांनी कंपनीमधील कामाच्या घातक वर्क कल्चरची माहिती दिली आहे. कंपनी अतिकष्टाला पाठिंबा देते आणि मानवी हक्कांची कशी कुंचबणा तिच्या लेकीने सहन केली याची माहिती दिली आहे. सध्या आई Anita Augustine यांचा इमेल सोशल मीडीयात वायरल झाला आहे.

Perayil ने सीए ची परीक्षा 2023 मध्ये पास केली होती त्यानंतर ती मार्च 2024 ला पुण्याच्या EY मध्ये रूजू झाली. executive पदावर ती काम करत होती. हा तिचा पहिलाच जॉब अ‍सल्याने जोमात काम करत होती मात्र या कामाचा अति ताण तिच्या शारिरीक, मानसिक आरोग्यावर घातक परिणाम करत होता. तिच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, कामामुळे तिला निद्रानाश, ताण, बैचेनी जाणवत होती. मात्र अशा परिस्थितीमध्येही तिने काम रेटलं होतं. यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि चिकाटी महत्त्वाची असल्याची स्मजूत तिने करून घेतली होती.

आई Augustine चा इमेल व्हायरल

अतिताणामुळे अनेकजण काम सोडत असताना तिला वरिष्ठांकडून काम करत राहण्याची आणि टीम मधील इतरांचे मत परिवर्तन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. Augustine यांनी केलेल्या दाव्यानुसार, 'तिच्या मॅनेजरने अनेकदा क्रिकेट मॅच दरम्यान मिटिंग रिशेड्युल केल्या आणि तिला दिवसाअखेरीस काम दिले.पार्टीमध्येही वरिष्ठांनी तिला मॅनेजर खाली काम करणं कसं कठीण आहे यावरून तिची थट्टा केली होती. दुर्देवाने ती गोष्ट सत्यात उतरली. '