EVM Machine Theft: ईव्हीएम मशीन चोरीला, कंट्रोल युनिटही बेपत्ता; पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातील घटना
पुणे (Pune News) जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील (Purandar Taluka) सासवड तहसील (Saswad Tehsil Office) कार्यालय येथून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. तहसील कार्यालयातून चक्क ईव्हीएम मशिनच चोरीला (EVM Machine Theft) गेल्याची धक्कादायक माहिती आहे.
ईवीएम हटाओ देश बचाओ (Evm Hatao Desh Bachao) अभियान संबंध देशभर जोर धरत आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकते. ज्यामुळे लोकशाही प्रणालीत मतदान प्रक्रिया निष्पक्ष पार पडत नाही, असा अनेकांना आक्षेप आहे. यावरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. दरम्यान, पुणे (Pune News) जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील (Purandar Taluka) सासवड तहसील (Saswad Tehsil Office) कार्यालय येथून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. तहसील कार्यालयातून चक्क ईव्हीएम मशिनच चोरीला (EVM Machine Theft) गेल्याची धक्कादायक माहिती आहे. कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात इव्हीएम मशिन्स ठेवण्यात आल्या आहेत. त्यातीलच काही मशीन चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ईव्हीएम चोरीच्या वृत्ताने खळबळ
ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची माहिती मिळताच पुणे जिल्ह्यासह सासवड शहर आणि तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवार आणि रविवार अशी सलग दोन दिवस तहसील कार्यालयाला नियमीत सुट्टी होती. सुट्टीनंतर सोमवारी तहसील कार्यालयातील कर्मचारी नियमीतपणे कर्तव्यावर हजर झाले. या कर्मचाऱ्यांना स्ट्रॉगरुमचे कुलुप तोडण्यात आल्याचे पाहयला मिळाले. त्यांनी तातडीने ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. (हेही वाचा, Sanjay Raut Challenge BJP: बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, प्रभू रामच काय 33 कोटी देवही तुम्हाला वाचवणार नाहीत; संजय राऊत यांचे भाजपला थेट आव्हान)
इव्हीएम मशीनचे कंटोल युनीट चोरीस
दरम्यान, वरिष्ठांनी केलेल्या पाहणीत पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरुमध्ये असलेल्या एकूण इव्हीएम मशीनपैकी एक मशिन चोरीला गेल्याची पुष्टी झाली. सध्यास्थितीत एक मशिन चोरीला गेल्याची माहिती आहे. दरम्यान, स्ट्रॉंगरुममध्ये एकूण किती मशीन्स होती आणि त्यापैकी किती गायब आहेत. याबाबत अद्यापही स्पष्टता येऊ शकली नाही. याबाबत सखोल माहिती मिळू शकली नाही. प्राप्त माहितीनुसार, इव्हीएम मशीनचे कंटोल युनीट चोरी करण्यात आले आहे. ईव्हीएम मशिन्स ही अत्यंत सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यात येतात. त्यामुळे अशा ठिकाणावरुन ईव्हीएम मशिनची चोरी होणे ही बाब धक्कादायक मानली जात आहे. दरम्यान, सासवड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी दाखल तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची दखल गांभीर्याने घेतली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपासात अधिक गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि मतदानाच्या आकडेवारीत तफावत; 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स'ने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव)
ईवीएम हटाओ देश बचाओ
दरम्यान, ईव्हीएम विरोधात देशभरात जनमत तयार होऊ लागले आहे. केंद्र सरकार निवडणूक आयोगाला अथवा मतदना प्रक्रियेतील काही लोकांना हाताला धरुन ईव्हीएममध्ये फेरफार करत असल्याचा देशभरातील अनेक नामवंतांनी आरोप केला आहे. याममध्ये विचारवंत, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, अभियंते, सामाजिक चळवळीतील लोक, राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि विविध संस्थांचा समावेश आहे. ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांद्वारे म्हणजेच बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, ही मागणी वाढत आहे. या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयात विविध याचिकाही दाखल झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असा विश्वास केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. असे असले तरी ईव्हीएमविरोधात संभ्रम कायम आहे. त्यातच आता ईव्हीएम चोरीला गेल्याच्या वृत्ताने अधिक खळबळ उडवून दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2024 12:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

