भविष्यात भाजप- शिवसेना एकत्र आली तरी, निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढणार- चंद्रकांत पाटील

या बैठकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) युतीबाबत भाष्य केले आहे.

चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

भाजप प्रदेश कार्यकारिणीची सोमवारी पहिली बैठक झाली. या बैठकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) युतीबाबत भाष्य केले आहे. "राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही. शिवसेनेला उपरती झाली, तर येतील, आम्ही काही प्रयत्न करणार नाही. भाजपने हात पुढे केला असे काही अर्थ काढू नका, असे चंद्रकांत पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवासांपासून सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेत्यांमध्ये शाब्दीक चकमक सुरू आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे. टीव्ही9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, जर-तर अशी हवेतली चर्चा सुरु आहे. केंद्रीय नेतृत्वाची जर चर्चा झाली, तर जसे बिहारमध्ये नितीश कुमारांनी वर्षभरात लालूंची साथ सोडली, तसे शिवसेनेला वाटले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून, त्याबाबत चर्चा होऊ शकते. पण या जर-तरच्या गोष्टी आहेत. आम्ही आज विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहोत. शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवून, मोदींच्या प्रतिमेचा फायदा घेतला. जर एकत्र यायची वेळ आली, तरी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र निवडणुका लढणार नाही. निवडणुका झाल्यानंतर दोघांची मेजॉरिटी झाली नाही, तर एकत्र येऊ शकतात. शिवसेनेने निवडणुका एकत्र लढवून पळ काढला, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद संदर्भात बोलावली महत्वाची बैठक

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजप- शिवसेनेने एकत्र निवडणुक लढवली होती. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेला 56 जागेवर विजय मिळवता आला होता.