Abdul Sattar: काल टीईटी घोटाळ्याचा पर्दाफाश तर आज अब्दुल सत्तारांना मंत्री पद; अनेकांना आश्चर्याचा धक्का
टीईटी घोटाळ्याचा शिंदे गट नेते नेते अब्दुल सत्तार यांच्या मंत्रीपदावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं तरी आज झालेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या विस्तारात अब्दुल सत्तार यांनी मंत्री पदाची शपथ घेतलेली आहे.
काल राज्याच्या राजकारणात दिवसभर गजाला तो मुद्दा म्हणजे टीईटी घोटाळा (TET Scam). या घोटाळ्यात शिंदे गटातील मोठे नेते अब्दुल (Abdul Sattar) सत्तारांची नावं पुढे आल्याने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती. तसेच या घोटाळ्यात खुद्द अब्दुल सत्तारांचा देखील सहभाग असल्याची शंका विरोधकांकडून दर्शवण्यात आली होती. तरी मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet expansion) अवघ्या एका दिवसावर येवून ठेपला असताना अशा पध्दतीच्या गंभीर आरोप होणं ही बाब अब्दुल सत्तार यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत थोडी धोका निर्माण करणारी होती. कारण अब्दुल सत्तार यांचं नावं मंत्रीमंडळाच्या शर्यतीत आहे हे पूर्वीचं उघड होत पण टीईटी घोटाळ्याचा त्यांच्या मंत्रीपदावर काय परिणाम पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं तरी आज झालेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या विस्तारात नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्री पदाची शपथ घेतलेली आहे.
शिंदे गटातील (Shinde Group) नेते अब्दुल सत्तारांनी घेतलेली शपथ ही बरेच लोकांना आश्चर्यचकित करणारी होती. पण आता पुढे टीईटी घोटाळ्याचं काय होणार किंवा अब्दुल सत्तार यांच्या मंत्रीपदावर त्याचे काही पडसाद उमटतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तरी अब्दुल सत्तारांसह शिंदे गटातील एकूण 9 आमदारांनी (MLA) मंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. यांत दादा भुसे (Dada Bhuse), संजय राठोड (Sanjay Rathod), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), संदिपान भुमरे (Sandipan Bhumare), उदय सामंत (Uday Samant), तानाजी सावंत (Tanaji Sawant), दिपक केसरकर (Deepak Kesarkar), शंभूराज देसाई (Shambhuraje Desai) यांचा समावेश आहे. तर भाजपातून देखील 9 आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे यांत राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विजयकुमार गावित (Vijay Kumar Gavit), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), गिरीष महाजन (Girish Mahajan), सुरेश खाडे (Suresh Khade),रविंद्र चव्हान (Ravindra Chauhan), अतुल सावे (Atul Save) आणि मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला;18 मंत्र्यांनी घेतली शपथ, जाणून घ्या नव्या मंत्र्यांच्या नावांसह सविस्तर माहिती)
तसेच काल टीईटी घोटाळा प्रकरणावर प्रतिक्रीया देताना अब्दुल सत्तार म्हणाले, बदनामीसाठी हा सगळा कट रचला आहे. आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा, असं सत्तार यांनी म्हटलं. या प्रकरणाची नीट चौकशी व्हावी. कुणाचीही बदनामी करण्याचं काम कुणी करु नये. चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी असंही सत्तारांनी म्हटलं होतं. तरी मंत्री अब्दुल सत्तार आता यांच्याकडे नेमक कुठलं खातं देण्यात येणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.