Essel World Shut Down? सोशल मिडीयात 90s च्या युजर्सनी जुन्या आठवणींना उजाळा देत शेअर केले ट्वीट्स
एस्सेल वर्ल्डच्या अधिकृत वेबसाईट वर “We are temporarily closed until further notice.” असा मेसेज दिसत आहे.
नव्वदीच्या दशकातील मुलांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये हमखास असणारे अम्युझमेंट पार्क Essel World बाबत वाईट बातमी समोर आली आहे. सध्या Essel World तात्पुरतं बंद असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. सगळ्या चांगल्या गोष्टींचा शेवट होतो असं म्हटलं जातं ते आता Essel World सोबतही होणार का? असं अनेकांना वाटत आहे. मुंबई जवळ गोराई भागात Essel World हे 22 एकर मध्ये वॉटर पार्क, बर्ड पार्क, स्केटिंग पार्क आणि अनेक राईडने सज्ज होते. 1989 मध्ये त्याची सुरूवात झाली होती. पण आता त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर “We are temporarily closed until further notice.” असा मेसेज दिसत आहे.
90च्या दशकात प्रत्येक शाळेची सहल या Essel World मध्ये आयोजित केलेली असायची त्यामुळे एस्सेल वर्ड आणि वॉटर किंग्डमची आठवण आजही ताजी आहे. जेव्हापासून एस्सेल वर्ड बंद झाल्याची माहिती समोर आली आहे तेव्हापासून आता हे अम्युझमेंट पार्क कायमचं बंद होणार का? असं प्रश्न अनेकांनी विचारला आहे. अद्याप त्याची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कोविड 19 संकटानंतर एस्सेल वर्ल्ड बंद आहे. अनेक जण उन्हाळी सुट्ट्यांमध्ये हमखास मुलांना घेऊन एस्सेल वर्ल्ड मध्ये येत होते पण आता हे आकर्षण कमी झालं आहे.
' एस्सेल वर्ल्ड मे रहुंगा में घर नही जाऊंगा मैं' ही टॅग लाईन आणि त्यासोबत जावेद जाफरीच्या आवजातील टीझरही अनेकांना जुन्या आठवणी ताज्या करत आहे. Ranichi Baug चं तिकीट आता ऑनलाईन अन घरबसल्या देखील काढण्याची सोय; पहा कुठे, कसं?
एस्सेल वर्ल्ड च्या प्रसिद्ध राइड्सच्या यादीमध्ये शॉट-एन-ड्रॉप, हूला लूप आणि टनेल ट्विस्टर यांचा समावेश होता. या अॅम्युझमेंट पार्कमध्ये 50 हून अधिक गोष्टी आहेत, ज्यात साहसी राइड, बॉलिंग अॅली, एक आइस-स्केटिंग रिंक, एक डिस्को आणि सुंदर हिरवीगार जागा यांचा समावेश आहे. वॉटर किंगडम म्हणून ओळखले जाणारे वॉटर पार्क देखील आकर्षणाचा भाग होता.