कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांशी साधला ई-संवाद; उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घेण्याचं केलं आवाहन
कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज राज्यातील प्रमुख उद्योजकांशी साधला ई-संवाद साधला. या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आदी पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते. यावेळी उद्योजकांनी शासनासोबत खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. तसेच कोविड नियंत्रणासाठी शासन करत असलेल्या अथक प्रयत्नांचे उद्योग जगतातील प्रतिनिधींनी अभिनंदन केले. तसेच काही सूचनाही मांडल्या. सध्या लोकांचा जीव वाचविण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल, त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याची ग्वाहीदेखील उद्योग प्रतिनिधींनी यावेळी दिली.
राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव वाढल्याने उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविडबाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना केलं आहे. (वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन, म्हणाले 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं')
दरम्यान, या बैठकीस उद्योजक उदय कोटक, अजय पिरामल, सज्जन जिंदाल, बाबा कल्याणी, हर्ष गोयंका, निखिल मेस्वानी, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, अपूर्व भट्टाचार्य, हर्ष गोयंका, बोमन इराणी, राजीव रस्तोगी, संजीव बजाज, मनदीप मोरे, इशान गोयल, अमित कल्याणी, अपूर्व देशपांडे, जफर खान, राजेंद्र गाडवे आदी उपस्थित होते.