Enforcement Directorate: ईडीची नोटीस आलीय? घाबरु नका, आधी खात्री करा, फसवणूक करणारी टोळी सक्रीय

जेणेकरुन अशा प्रकारची तक्रार आल्यास अथवा माहिती मिळाल्यास अशा टोळीकडून फसवणूक होण्यापासून नागिरकांना वाचवता येऊ शकेल. सर्व राज्यांच्या पोलिस प्रमुखांना लिहिलेल्या एका पत्रात इडीने म्हटले आहे की, अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे.

Enforcement Directorate | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडी (ED) म्हटलं की भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र, तुम्हालाही अशी नोटीस मिळाली तर मुळीच घाबरु नका. आगोदर ही नोटीस खरोखरच अंमलबजावणी संचालनालय कार्यालयाकडून आली आहे का? याची खात्री करुन घ्या. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या विशेष वृत्तात म्हटले आहे की, ईडीच्या नावाखाली फसवणूक करणारी एक टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी देशभरातील विविध राज्यांतील नागरिक, व्यावसायीक, बँका आणि संस्थांना नोटीस पाठवत आहेत. त्यांच्याकडून जबरदस्तीने वसुली करत आहेत. महाराष्ट्रातील एका व्यक्तीकडून तक्रार आल्यानंतर ईडीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच, विविध राज्यांतील पोलिसांना त्याबाबत पत्रही लिहीले आहे.

फसवणूक करणाऱ्या संबंधित टोळी विरोधात अंमलबजावणी संचालनालय कार्यरत झाले आहे. या टोळीला लगाम लावण्यासाठी आणि हा गोरखधंदा उधळून लावण्यासाठी ईडी राज्य सरकारांसोबत संपर्क ठेऊन आहे. प्रामुख्याने कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली येथे ही टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाल्याचा संशय आहे. त्यामुळे ईडी या राज्यांतील सरकारांसोबत संपर्क साधून आहे. ईडीने म्हटले आहे की, ही टोळी ईडीच्या नावाकाली अनेक संस्था, व्यावसायिक, बँका आणि नागरिकांना नोटीस पाठवते आणि पैशांची मागणी करते.

आयएनएसने आपल्या वृत्तत म्हटले आहे की, ईडी राज्यांतील पोलिसांसोबत संपर्कात आहे. जेणेकरुन अशा प्रकारची तक्रार आल्यास अथवा माहिती मिळाल्यास अशा टोळीकडून फसवणूक होण्यापासून नागिरकांना वाचवता येऊ शकेल. सर्व राज्यांच्या पोलिस प्रमुखांना लिहिलेल्या एका पत्रात इडीने म्हटले आहे की, अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने काही घटनांमध्ये अनेक व्यापारी आणि व्यक्तींची बँक खाती गोठविण्याबाबत बँकांना बनावट नोटीस पाठवली आहे. अशा पद्धतीने व्यापारी आणि नागरिकांना समन्स आणि पत्रही (नोटीस) पाठवले आहे. ज्यात त्यांना ईडीच्या कार्यालायत उपस्थित राहण्याबाबतही सांगितले आहे. (हेही वाचा, Nirav Modi Assets Confiscated: नीरव मोदी याची 326.99 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; मुंबई, अलीबागसह जैसलमेर येथील पवन चक्की, लंडन येथील फ्लॅटचाही समावेश)

प्राथमिक तपासानांत इडीने संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने बँकांना अशा बनावट नोटीस विरोधात पोलीसात तक्रार देण्याबाबत सांगतले आहे. विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ईडीने चौकशी सुरु केली आहे. ईडीच्या माहिती आले आहे की ईडीच्या नावाने या टोळीने विविध बँका, काही विशिष्ट व्यक्तींना बनावट नोटीस पाठवले आहे. खास करुन या टोळीने ही पत्रं कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली येथील नागरिकांना पाठवली आहेत.

दरम्यान, प्राप्त माहितीवरुन दिल्ली पोलिसांनी 5 जणांना या प्रकरणात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्ती या 24 ते 35 वर्षे वयोगटातील आहेत. त्या दिल्ली आणि एनसीआर येथील आहेत. त्यांच्यावर खंडणी, फसवणूक अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.