एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाचा संबंध नाही- शरद पवार
कोरेगाव-भीमा प्रकरणी (Bhima Koregaon Case) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाराजी दर्शवत आपल्या पक्षाची बैठक बोलावली होती.
कोरेगाव-भीमा प्रकरणी (Bhima Koregaon Case) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाराजी दर्शवत आपल्या पक्षाची बैठक बोलावली होती. तसेच एल्गार परिषद (Elgar parishad) आणि भीमा कोरेगाव प्रकरणाची उलटसुटल चर्चा होत असल्याचे समजत आहे. यावरून शरद पवार यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्याचा पयत्न केला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाबाबत भाष्य केले आहे. तसेच दोन्ही प्रकरण वेगवेगळे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही त्या ठिकाणी उपस्थित होते.
एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. यातच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शरद पवार म्हणाले की, भीमा कोरेगाव-एल्गार याबाबत मी माझी मत व्यक्त केली. यामध्ये एक बाब आहे की, कोरेगाव-भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. कोरेगाव भीमा, एल्गार संदर्भात उलटसुलट चर्चा होत आहे. कोरेगाव भीमा हा कार्यक्रम वेगळा कार्यक्रम आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येत लोक त्या ठिकाणी जमतात. 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार झाला. त्यापूर्वी एक दिवस अगोदर पुण्याच्या शनिवारवाड्यावर झालेल्या 'एल्गार परिषदेचे आयोजन हे हिंसेचे मूळ कारण आहे. एल्गार परिषदेत गावकऱ्यांना भडकवण्यात आले होते. त्यामुळे हा वाद पेटला होता असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, संभाजी भिडे यांनी काही जणांसोबत आजूबाजूच्या गावांमध्ये वेगळे वातावरण निर्माण केले होते. संभाजी महाराजांची समाधी उद्ध्वस्त करण्यात आली. त्याचा परिणाम संघर्षात झाला. त्यामागे काय वस्तूस्थिती आहे, ते आज ना उद्या बाहेर येईल, असे पवारांनी नमूद केले आहे. हे देखील वाचा- Mumbai Fire: माझगाव जीएसटी भवनाला लागलेल्या आगीची कसून चौकशी होणार: अजित पवार
नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुदूर्ग येथे पत्रकार परिषद पार पडली. दरम्यान त्यांनी एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव या विषयावर भाष्य केले आहे. दलित बांधवांशी संबंधित जो विषय आहे. तो भीमा कोरेगावचा आहे. या प्रकरणाचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच एल्गार परिषद हा विषयच वेगळा आहे. केंद्राने एल्गार प्रकरणाचा तपास काढून घेतला आहे. मात्र, भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.