Electrocuted While Flying Kite: पतंग उडवणे बेतले जीवाशी, विजेचा झटका लागून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू,नाशिक येथील घटना

मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला एका मुलाचा विजेच्या तारांमध्ये अडकून विजेचा झटका लागून मृत्यू लागला आहे.

Electrocuted While Flying Kite PC Twitter

Nashik News: नाशिक मध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला एका मुलाचा विजेच्या तारांमध्ये अडकून विजेचा झटका लागून मृत्यू लागला आहे. गच्चीवर पंतग उडवत असताना विजेच्या तारांमध्ये अडकल्याने त्याला जोरात विजेचा झटका लागला. भाग्येश विजय वाघ असं मृत मुलाचे नाव आहे. दहावीचे शिक्षण पूर्ण करत होता. माहितीनुसार, पतंग उडवत असताना स्टीलच्या रॉडचा वापर केल्याचा समोर आला आहे. विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील साई राम रो हाऊसजवळ रविवारी ही घटना घडली.( हेही वाचा-  मुंबईमध्ये 12 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान हानिकारक मांजाच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर बंदी; )

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्येश रविवारी दुपारचं जेवळ झाल्यानंतर लगेच पतंग घेऊन गच्चीवर गेला. परिसरातील इतर मुले देखील गच्चीवर पतंग उडवत होते. दरम्यान पतंग सोडवण्याच्या प्रयत्नात अनावधानाने विजेच्या तारांशी संपर्क आला. संपर्कात आल्याने त्याला विजेचा झटका बसला. ही गोष्ट स्थानिकांना लक्षात येताच, त्याच्या घरांना या घटनेची माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर वडिलांनी त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना एकाने कॅमेरात कैद केली. विजेच्या तारांजवळ पतंग उडवणे हे मुलांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. सणा सुदीच्या दिवशी घरात मोठा घात घडल्याने भाग्येशच्या घरी शोककळा पसरली आहे.