Pune Shocker: 85 वर्षीय महिलेवर बलात्कार, पाशवी हल्ला; हिंजवडी येथून इलेक्ट्रिशियनला अटक
पुण्यातील हिंजवडी येथे 85 वर्षीय महिलेवर निर्घृणपणे हल्ला करून बलात्कार केल्याप्रकरणी एका 23 वर्षीय इलेक्ट्रिशियनला अटक करण्यात आली आहे.
पुणे (Pune News) येथील हिंजवडीजवळील (Hinjewadi Crime) हाऊसिंग सोसायटीत 23 वर्षीय इलेक्ट्रिशियनने (Electrician Arrested) 85 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 22 सप्टेंबरच्या संध्याकाळी ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, संशयिताने वृद्ध महिलेला तिच्या घरासमोर एकटे पाहिले. त्याने तिला हिंसकपणे जवळ ओढत जिन्याजवळ नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे कृत्य केल्यानंर त्याने तिचा तिचा गळा दाबून हत्येचाही प्रयत्न केल. मात्र, ती बेशुद्ध पडल्याचे पाहून पीडितेला तिथेच टाकून तो निघून गेला. प्रदीर्घ काळ उलटूनही वृद्धा घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध घेली असता, ती बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असून,तिची प्रकृती स्थिर आहे.
आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपीस 24 तासांच्या आत 23 सप्टेंबर रोजी सखारे वस्ती परिसरातून अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, या आधी तो सोसायटीतील विजेचे काम करण्यासाठी येथे आला होता. तो नेकरीच्या शोधात होता. दरम्यान, महिलेला एकटे पाहून त्याने परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. (हेही वाचा, Dindoshi Rape Case: 30 वर्षीय बापाचा पोटच्या 9 वर्षीय मुलीवर बलात्कार; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल)
आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल
मूळचा धाराशिव जिल्ह्यातील असलेल्या आरोपीवर भारतीय न्याय संहिताच्या अनेक कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. ज्यात बलात्कारासाठी कलम 64, खुनाच्या प्रयत्नासाठी कलम 109 आणि स्वेच्छेने गंभीर दुखापत केल्याबद्दल कलम 115 आणि 118 यांचा समावेश आहे. सहाय्यक निरीक्षक विजयकुमार धुमळ यांनी टाईम्स ऑफ इंडियाकडे पुष्टी करताना सांगितले की, संशयिताला 27 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरु असून, अधिक पुरावे गोळा केले जात आहेत. (हेही वाचा, Maharashtra: वैवाहिक वेबसाइटवर मैत्री करणं पडलं महागात, लग्नाच्या बहाण्याने 26 वर्षीय महिलेवर बलात्कार)
महिला आणि ज्येष्ठांसाठी महत्वाचे हेल्पलाईन क्रमांकः
दरम्यान, आपत्तालीन स्थिती निर्माण झाली तर मदत मागण्यासाठी महिला आणि ज्येष्ठांसाठीच्या सहाय्यक सेवा आणि हेल्पलाईन्सना संपर्क करण्यात यावा. त्यासाठी आवश्यक मदत क्रमांक खालील प्रमाणे:
- चाइल्डलाइन इंडियाः 1098
- बेपत्ता बालके आणि महिलाः 1094
- महिलांसाठी हेल्पलाईनः 181
- राष्ट्रीय महिला आयोगाची हेल्पलाईन:112
- पोलिस महिला आणि ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन क्रमांक: 7827170170-1091/1291
दरम्यान, या घटनेनंतर समाजात संतापाची लाट उसळली असून गृहनिर्माण संस्थांमधील वृद्ध रहिवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाय वाढवण्याची मागणी शेजारी आणि रहिवासी करत आहेत. दरम्यान, कायदेशीर कारवाई सुरू आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटलेआहे.