Coronavirus च्या धोक्यामुळे महापालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्या याबाबत राजेश टोपे यांनी केली शिफारस
या दोनही निवडणुका पुढील 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. हा महत्वपूर्ण निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घेण्यात आला आहे
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, मॉल्स, सिनेमागृहे बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर धार्मिक स्थळेही काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्यात सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका निवडणूका आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शिफारस करण्यात आली आहे. या दोनही निवडणुका पुढील 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्या अशी राजेश टोपे यांनी शिफारस केली आहे. हा महत्वपूर्ण निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घेण्यात आला आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्या याबाबत अशा सूचना विद्यापीठ मंडळाला देण्यात आल्या आहेत.
कोरोनाने सध्या महाराष्ट्रातही ब-यापैकी शिरकाव केला असून महाराष्ट्रात आतापर्यंत 38 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु आहेत. मात्र 38 हा आकडा देखील महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे असे सांगण्यात येत आहे. म्हणून खबरदारी घेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारशी सविस्तर चर्चा करुन या निवडणुका पुढे ढकलल्याची शिफारस केली आहे.
हेदेखील वाचा- Coronavirus मुळे पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, कोरोना संक्रमित देशांतील लोकांना रेल्वे बुकिंग आधी करावी लागणार आरोग्य तपासणी
यात महापालिकेच्या आणि पंचायतीच्या निवडणुका पुढील 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यासोबत विद्यापीठाच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात याव्यात याबाबत विद्यापीठ मंडळाशी याबाबत चर्चा सुरु आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने (Western Railway) देखील महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे तिकीट बुकिंग करण्यासाठी परदेशी नागरिकांची तसेच कोरोना संक्रमित राज्यांतून आलेल्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे परदेशी नागरिकांना कोरोना आजाराच्या तपासणीनंतरच रेल्वे तिकिट दिले जाणार आहे.