Shiv Sena Symbol And Party Name: निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडेच राहणार
पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे एकनाथ शिंदे गटाकडेच राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
Shiv Sena Symbol And Party Name: शिवसेनेतील सत्ताकारणावरून एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शुक्रवारी मोठा आदेश दिला. पक्षाचे नाव ‘शिवसेना’ आणि पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे एकनाथ शिंदे गटाकडेच राहण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. एकनाथ शिंदे यांचे बंड आणि उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतर दोन्ही गट शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण या मूळ निवडणूक चिन्हावर दावा करत होते.
हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असल्याने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले होते. पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांना दोन वेगवेगळी चिन्हे देण्यात आली. त्यात शिंदे गटाला दोन तलवारी आणि ढाल तर उद्धव गटाला मशालचे चिन्ह देण्यात आले होते. (हेही वाचा - NCP on Bhagat Singh Koshyari: भगत सिंह कोश्यारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिमटे, जाता जाताही डिवचलं; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल)
दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आम्ही नवीन चिन्ह घेऊन जनतेच्या दरबारात जाऊ आणि मग नवी शिवसेना स्थापन करू. ही लोकशाहीची हत्या आहे. कायद्याची लढाईही आम्ही लढणार आहोत. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले की, निवडणूक आयोग हा भाजपचा एजंट आहे. भाजपसाठी काम करतो. आता देशातील जनतेचा विश्वास बसला आहे.