महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मुंबईत निवडणूक आयोगाकडून 2,90,50,000 रोकड जप्त, अधिक तपास सुरु

त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मुंबईत एक इसमाकडून 2 कोटी 90 लाख 50 हजार किंमतीची रक्कम जप्त केली आहे.

Election Commission of India | File Image | (Photo Credits: PTI)

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची धडक कारवाई सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मुंबईत एक इसमाकडून 2 कोटी 90 लाख 50 हजार किंमतीची रक्कम जप्त केली आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत सविस्तर माहिती मिळाली नसून चौकशी सुरु असल्याचे कळतेय. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाना भायखळा आणि धारावी विधानसभा मतदार संघामध्ये सुमारे 63 लाख 9 हजार 755 रूपयांची संशयित रोकड जप्त केली होती.

याबाबातची अधिक माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे. ज्या व्यक्तीकडून ही रोकड जप्त करण्यात आली आहे तो मुंबईतील कोणत्या मतदारसंघातून पकडला गेला याबाबत अधिक चौकशी सुरु आहे.

ANI चे ट्विट:

निवडणूक आयोगाने जप्त केलेल्या संशयित रोकडीचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी धारावी मतदार संघामध्ये एका कारमध्ये अशाप्रकारे रोकड जप्त करण्यात आली आहे. हेदेखील वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: भायखळा, धारावी विधानसभा मतदार संघातून 63 लाख 9 हजार 755 रूपयांची संशयित रोकड जप्त

महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक 2019 साठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. 24 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे.



संबंधित बातम्या