Ramdas Athawale On New Maharashtra CM: एकनाथ शिंदे नाराज! देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार; रामदास आठवलेंचा दावा

पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज आहेत. त्याची नाराजी दूर करणे आवश्यक आहे, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

Ramdas Athawale | (Photo Credits: X/ANI)

Ramdas Athawale On New Maharashtra CM: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महत्त्वपूर्ण दावा केला आहे. महाराष्ट्रातील वाद लवकर संपला पाहिजे कारण भाजपच्या हायकमांडने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज आहेत. त्याची नाराजी दूर करणे आवश्यक आहे, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

रामदास आठवले यांनी म्हटलं आहे की, भाजपकडे एवढ्या जागा आहेत की तेही ऐकणार नाहीत. मला वाटते की एकनाथ शिंदे यांनी 2 पावले मागे यावे, जसे देवेंद्र फडणवीस यांनी 4 पावले मागे घेतले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री किंवा किमान केंद्रीय मंत्री व्हावे. (हेही वाचा -Maharashtra New Government Oath Ceremony: मोठी बातमी! महायुती सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता)

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार; रामदास आठवलेंचा दावा -

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यावर नक्कीच विचार करतील. काही निर्णय लवकर घेतले पाहिजेत. आम्हाला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 57 आमदारांची नितांत गरज आहे आणि त्वरीत तडजोड होऊन मंत्रिमंडळाचा विस्तार मोठ्या विश्वासाने व्हायला हवा, पण त्या मंत्रिमंडळात माझ्या पक्षाला एक मंत्रिपद मिळायला हवे. अशी मागणी मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.