Ajit Pawar: अजित पवार यांच्या खुलाशामुळे एकनाथ शिंदे गटाचा जीव भांड्यात, बार्गेनिंग पॉवर कायम

त्यामुळे शिंदे गटाने सुटकेचा निश्वास सोडला. अजित पवार यांच्या भाजपसोबत येण्याच्या वृत्तानेही शिंदे गटातील नाराजी दिसून आली होती. अजित पवार भाजपसोबत आल्यास शिंदे गट वेगळा होईल, अशीही काही विधाने शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

CM Eknath Shinde, Ajit Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

'जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबतच राहणार' असा खुलासा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा जीव भांड्यात पडला. अजित पवार भाजपसोबत आले असते तर एकनाथ शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर (Bargaining Power) कमी झाली असती. मात्र, आता स्वत: अजित पवार यांनीच आता खुलासा केला. त्यामुळे शिंदे गटाने सुटकेचा निश्वास सोडला. अजित पवार यांच्या भाजपसोबत येण्याच्या वृत्तानेही शिंदे गटातील नाराजी दिसून आली होती. अजित पवार भाजपसोबत आल्यास शिंदे गट वेगळा होईल, अशीही काही विधाने शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अजित पवार भाजपसोबत जाणार नाहीत. जर तसे घडले तर शिंदे गट सत्तेत राहणार नाही, असा इशाराच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपसोबत सत्तेत असली तरी त्यांच्यात सर्वच काही अलबेल नसल्याचे चित्र पुढे आले होते. अजित पवार हे लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांच्या झालेल्या पराभवापासूनच नाराज आहेत. त्यामुळे वज्रमुठ सबेतही ते स्वत:चे स्थान शोधत असतात, असे शिरसाट यांनी म्हटले. दरम्यान असले तरी ते भाजप सोबत जातील याबाबतचे वृत्त संजय शिरसाट यांनी फेटाळून लावले होते. (हेही वाचा, 'जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी पक्षासोबतच राहणार' Ajit Pawar यांनी त्यांच्या भाजपा सोबत जाण्याच्या वृत्तांवर लावला पूर्णविराम)

पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी स्पष्टपणे खुलासा केला की, काहीही झाले तरी आपण राष्ट्रवदीसोबतच असणार आहोत. जीवात जीव आहे तोपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या निराधार आहेत. त्यात यत्किंचीतही तथ्य नसल्याचे सांगत पवार यांनी या वृत्तांवर पडदा टाकला. तसेच, 40 आमदारांच्या सह्या घेतल्याच्या वृत्ताबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, कोणत्याही आमदारांच्या सह्या घेण्याचे काहीच कारण नाही. बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडली असली आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपसोबत सत्तेत असली तरी महाविकासआघाडी भक्कम असल्याचे चित्र आहे. महाविकासआघाडीच्या वज्रमुठ सभेला लोक मोठी गर्दी करत आहेत. इतकेच नव्हे तर, उद्धव ठाकरे यांच्या सभांनाही स्वतंत्रपणे मोठी गर्दी होत आहे. अशा वेळी भाजपसोबत सत्तेत असताना एकनाथ शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर वाढली होती. दरम्यान, अजित पवार यांच्या संभाव्य एन्ट्रीने मात्र शिंदे गटाच्या बार्गेनिंग पॉवरला काहीसा धक्का बसल्याचे सांगितले जात होते. मात्र, अजित पवार यांनीच प्रसारमाध्यमांतील वृत्तांवर खुलासा केल्याने. शिंदे गटात काहीसे निश्चिंततेचे वातावरण असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.