IPL Auction 2025 Live

Shinde Faction MP Interested in Lotus? शिंदे गटातील खासदारांना 'कमळा'चे वेध? राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

प्रसारामाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शिंदे गटातील (Eknath Shinde Faction) बहुतांशी खासदार हे धनुष्यबाण चिन्हाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असून, त्यांना भाजपच्या 'कमळ' चिन्हाचे आकर्षण वाटू लागले आहे.

CM Eknath Shinde | (Photo courtesy: archived, edited, symbolic)

Lok Sabha Election 2024: राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दणदणीत यशामुळे सत्ताधारी पक्षाच्या शिडात आत्मविश्वासाचे वारे शिरले आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्षही मानसिकदृष्ट्या दबावात असल्याची चर्चा असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदारांचे मनसुबे वेगळेच असल्याचे बोलले जात आहे. प्रसारामाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शिंदे गटातील (Eknath Shinde Faction) बहुतांशी खासदार हे धनुष्यबाण चिन्हाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असून, त्यांना भाजपच्या 'कमळ' चिन्हाचे आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे भविष्यात लोकसभेवर निवडूण यायचे राजकारणाच्या चिखलात कमळ हाती धरायला हवे, हा विचार या खासदार मंडळीत बळावू लागल्याची चर्चा आहे. अर्थात अद्याप या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

नाना पटोले यांनी भाष्य करणे टाळले

दरम्यान, नागपूर येथे सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रसारमाध्यांनी विचारले असता, त्यांनी शिंदे गटातील खासदारांवर फारसे भाष्य केले नाही. ते इतकेच म्हणाले की, त्यांना भाजपच्या चिन्हावर लढायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्यावर बोलणार नाही. असे असले तरी शिंदे गटात सर्वच काही अलबेल नसल्याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (हेही वाचा, Datta Dalvi Bail: दत्ता दळवी यांना मुख्यमंत्र्यांना जाहीर सभेत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर)

शिवसेना कोणाची? प्रकरण कोर्टा प्रलंबीत

शिंदे गटातील खासदार 'कमळा'साठी इच्छुक असले तरी, भाजपने मात्र याला अद्याप मान्यता दिली नसल्याचे समजते. शिवसेना पक्षात बंड केल्यानंतर मोठ्या राजकीय चातुर्याने आणि कायदेशीर मार्ग वापरुन एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मिळवली आहे. अर्थात अद्यापही शिवसेना कोणाची हा निर्णय झाला नाही. केवळ केंद्रीय निवडणुक आयोगाच्या कृपेने एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि पक्षचिन्ह मिळाले आहे. असे असले तरी, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे आणि प्रलंबीत आहे. (हेही वाचा, Ramdas Kadam vs Gajanan Kirtikar: 'बायकोशी गद्दारी, पुण्यात खातात शेण'; रामदास कदम यांचा गजानन कीर्तीकर यांच्यावर व्यक्तीगत हल्ला)

भाजपची पंचायत

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडूण आलेल्या शिवसेना पक्षातील एकूण 18 पैसी 13 खासदर शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. आगामी काळात निवडूण यायचे तर केवळ एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुरेसे ठरणार नाही. ही बाब हे खासदार जाऊन आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपनेच शिवसेना पक्ष फोडल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप आणि दावा आहे. जनमानसातही तशीच प्रतिमा आहे. अशा वेळी या खासदारांना सोबत घेऊन भाजपचे तिकीट देत कमळावर लढवले तर उद्धव ठाकरे यांचा दावा खरा असल्याचे सिद्ध होईल. पुढे त्याचा राजकीय फटकाही बसू शकतो, अशी भीती भाजपला आहे. दरम्यान, भाजपला जास्तीत जास्त जागा लढवायच्या तर विरोधी पक्षांच्या जागांवर डोळा ठेवावा लागेल आणि शिंदे गटातील खासदार तर आगोदर निडून आल्याने जागा सोडणार नाहीत अशी भाजपसमोर पंचायत आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडते याबाबत उत्सुकता आहे.