Eknath Khadse To Join NCP: एकनाथ खडसे 23 ऑक्टोबरला एनसीपी मध्ये प्रवेश करणार; जयंत पाटील यांची माहिती

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थोड्याच वेळापूर्वी त्याची अधिकृत घोषणा केली आहे.

Eknath Khadse (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना भाजपाने (BJP) तिकीट नाकरल्यापासून त्यांच्या सुरू असलेल्या नाराजीनाट्याचा अखेर आता अंत झाला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची (NCP) वाट धरली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थोड्याच वेळापूर्वी त्याची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे 23 ऑक्टोबरला एकनाथ खडसे यांचा एनसीपीमध्ये प्रवेश होईल असं त्यांनी अधिकृतपणे जाहीर केले आहे.

दरम्यान त्यांनी भाजपाच्या स्दस्यत्त्वाचा राजीनामा दिला असल्याचं वृत्त आज सकाळपासून व्हायरल झालं आहे. काही दिवसांपूर्वी घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे एनसीपीमध्ये प्रवेश करू शकतात असे अंदाज होते. मात्र अखेर एनसीपीने आता शुक्रवारी त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे जयंत पाटील यांचे ट्वीट आज सकाळी खडसेंनी रिट्वीट केले होते. त्यानंतर डिलीटही झाले. त्यामुळे चर्चा पुन्हा रंगल्या होत्या. Sharad Pawar On Eknath Khadse: एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार? स्वत: शरद पवार यांनीच दिले संकेत, काय म्हणाले पाहा

एकनाथ खडसे हे सतत्याने भाजपावर नाराज होते. त्यांनी खुलेपणाने अनेकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा आज संपुष्टात आली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान विधानसभा निवडणूकांमध्ये नाराज झालेल्यांच्या यादीमध्ये एकनाथ खडसेंसोबत पंकजा मुंडे यांचे देखील नाव अग्रणी होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी देत त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे.

एकनाथ खडसे हे अनेक वर्ष भाजपामध्ये वरिष्ठ नेते होते. ते मुक्ताईनगर मधून आमदार झाले होते. त्यानंतर सरकारमध्ये असताना यांनी महसूल मंत्री पद भूषवलं आहे.  2009-2014 मध्ये ते विरोधी पक्ष नेते होते. 1995-99 मध्ये  पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. 2014 मध्ये महसूल मंत्री व कृषी मंत्री देखील होते.