माळी समाजाचे ओबीसी नेते एकनाथ खडसे समर्थक अनिल महाजन यांचा जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश

भाजपाच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य व प्राथमिक सदस्यांचा राजीनामा देत बाहेर पडलेल्या माळी समाजाचे ओबीसी नेते एकनाथ खडसे समर्थक अनिल महाजन (Anil Mahajan) यांचा जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (Nationalist Congress Party) मध्ये जाहीर प्रवेश झाला आहे.

Anil Mahajan (Photo Credits: File)

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपाला (BJP)  रामराम करत आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यानंतर त्यासोबत भाजपाच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य व प्राथमिक सदस्यांचा राजीनामा देत बाहेर पडलेल्या माळी समाजाचे ओबीसी नेते एकनाथ खडसे समर्थक अनिल महाजन (Anil Mahajan) यांचा जयंत पाटील (Jayant Patil)  यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (Nationalist Congress Party)  मध्ये जाहीर प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय येथे प्रवेश समारंभ संपन्न झाला यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या यांच्या हस्ते अनिल महाजन यांना प्रवेश देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुरोगामी विचारसरणीचा असल्यामुळे यांचे हात बळकट करण्यासाठी, ओबीसी बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आज एकनाथ खडसे यांच्यासोबत महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष,ओबीसी जनक्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांनी जाहीर प्रवेश केला आहे.

भारतीय जनता पार्टी पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा व भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदाचा राजीनामा काल रात्री अनिल महाजन यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकात दादा पाटील व योगेश टिळेकर यांना ईमेल द्वारे पाठवला आहे असे अनिल महाजन यांनी सांगितले आहे.

अनिल महाजन हे खडसे समर्थक आहेत. माजी महसूल मंत्री ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे अतिशय निकटवर्तीय महाजन हे मानले जाणारे आहेत. एकनाथ खडसेंपाठोपाठ अनिल महाजनांनी भाजपाला रामराम केला. अनिल महाजन यांनी माळी समाजाचे ओबीसी समाजाचे एक कुशल संघटन राज्यात उभे केले आहे.राज्यभर एक वेगळी ओळख महाजन यांनी निर्माण केली आहे. ओबीसीचे अनेक कार्यकर्ते लवकरच भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी सुत्रांची माहिती आहे.