Eknath Khadse Reply To Raksha Khadse: 'भाऊ भाजपमध्ये या', खासदार सुनबाईंच्या अवाहनावर एकनाथ खडसे काय म्हणाले? घ्या जाणून

अर्थात भाजप प्रवेशाबाबत खूप वरच्या पातळीवर निर्णय होतात मी खूप छोटी कार्यकर्ता आहे. पण, तरीही मला वाटते की, त्यांनी भाजपमध्ये यावे.

Eknath Khadse And Raksha Khadse | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात (BJP) यावे, अशी भावना व्यक्त केली आहे. अर्थात भाजप प्रवेशाबाबत खूप वरच्या पातळीवर निर्णय होतात मी खूप छोटी कार्यकर्ता आहे. पण, तरीही मला वाटते की, त्यांनी भाजपमध्ये यावे. वाचकांच्या माहितीसाठी असे की, रक्षा या एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत. त्यामुळे घरातूनच अवाहन आल्यानंतर त्याला प्रतिसाद देणे ज्येष्ठ नेत्यास भाग होते. त्यामुळे आलेल्या अवाहनावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, त्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे. पण आपण मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहू.

'नाथाभाऊंनी भाजपमध्ये यावे ही माझी इच्छा'

रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, पाठिमागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये अनेक मोठमोठे प्रवेश होत आहे. विविध राजकीय पक्षातील बडे नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. अशा वेळी एकनाथ खसडे यांनीही भाजपमध्ये यावे असे मला वाटते. अर्थात ही माझी इच्छा आहे. पण, भाजपमध्ये खूप वरच्या पातळीवर निर्णय होतात, असेही त्यांनी म्हटले होते. (हेही वाचा, Eknath Khadse Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वैयक्तीक त्रास, राज्यातील राजकारणही गढूळ; एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप)

'शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबत'

रक्षा खडसे यांच्या वक्तव्यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, मी भाजपमध्ये यावे असे रक्षाताईंना वाटणे स्वाभाविक आहे. पण, आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. काही कारणामुळे आपणास भाजप सोडावा लागला. आता शेटपर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहू. जायचे असते तर आगोदरच गेलो असतो. शक्यतो अजित पवार यांच्यासोबतही गेलो असतो. पण, आता आपला निश्चित मार्ग ठरला असून, आपण शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन खडाखडी, रोहिणी खडेसे यांची टीका रक्षा खडसे यांच्याकडून प्रत्युत्तर)

रावेर मतदारसंघात बदलली राजकीय समिकरणे

रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधीत्व करतात. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने स्वत: एकनाथ खडसे यांनीच उभा राहावे, अशी चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली तर सासऱ्यांना घरातूनच आव्हान द्यायचे का, त्यातच बदलत्या राजकीय समिकरणांमुळे भाजपकडून रक्षा यांना तकीट मिळणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

दुसऱ्या बाजूला, काही दिवसांपूर्वीच भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले होते की, एकनात खडसे हे भाजपमध्ये यायला उत्सुक आहेत. त्यांचा वरिष्ठ नेत्यांशी संपर्क सुरु असल्याचेही महाजन म्हणाले होते.