Palghar: गाडीच्या सनरूफ मध्ये उभ्या असलेल्या 8 वर्षीय मुलाचा मांज्याने चिरला गळा; वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याने जीव गेल्याचा कुटुंबीयांचा दावा

गाडीच्या सनरूफ मध्ये उभा असलेला मुलगा मांज्याने गळा फिरला गेल्याने मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Representational Image (Photo Credits: Twitter)

मुंबईमध्ये (Mumbai) मांज्याने (Kite String) अजून एका लहान मुलाचा जीव घेतला आहे. गाडीच्या सनरूफ मध्ये उभा असलेला मुलगा मांज्याने गळा फिरला गेल्याने मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत मुलाचे वडील गाडी चालवत असताना पालघरच्या मनोर भागात ही घटना घडली आहे. दिशांत तिवारी असं मृत मुलाचं नाव असून वैद्यकीय सुविधा वेळीच न मिळाल्याने जीव गेल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला आहे.

दिशांत हा मालाड च्या Vibgyor School चा विद्यार्थी होता. कांदिवली मध्ये तो राहत होता. दरम्यान त्याच्या पालकांना योग्य उपचार शोधण्यासाठी 2 तास गेले पण तो पर्यंत खूप उशिर झाला होता.

मागील रविवारची ही घटना असून प्रसाद तिवारी त्याच्या कुटुंबासोबत निघाला होता. प्रसाद सोबत त्याची पत्नी, 2 वर्षांची मुलगी, मुलगा दिशांत, 12 वर्षांची भाची Keisha आणि पालक प्रविण, लता होते. मनोर जवळ असलेल्या त्याच्या एका मित्राच्या फार्म हाऊस मध्ये जाण्यासाठी निघाला होता.

मिड डे सोबत बोलताना प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही Galtare, Hamrapur Road द्वारा निघालो होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ होती. दिशांतला हे दृश्य सनरूफ मधून पहायचं होते. त्यामुळे त्यांनी सनरूफ उघडलं. अगदी 200 मीटरचा रस्ता कापला नाही तोच दिशांतचा गळा मांज्याने चिरला गेला आणि तो गाडीत कोसळला. त्यानंतर मुलाला ग्लोबल हॉस्पिटल मध्ये नेले पण तिथे पुरेशी वैद्यकीय सुविधा नव्हती आणि डॉक्टरही नव्हते. अ‍ॅम्ब्युलंस मिळवण्यामध्येही बराच वेळ गेला.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये कार्डिएक अ‍ॅम्ब्युलंस मिळणं अपेक्षित असतं पण आम्हांला जी मिळाली ती काहीच सुविधा देऊ शकणारी नव्हती त्यामुळे माझ्या मुलाला त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचं दिशांतचे वडील म्हणाले. संस्कृती हॉस्पिटलमध्ये पोहचलो पण तो पर्यंत डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं होतं. पहिल्या अर्धा तासांतच त्याला उपचार मिळाले असते तर कदाचित त्याला वाचवता आलं असतं. घटनेनंतर उपचार मिळेपर्यंत 2 तास गेले यामध्ये मुलाला गमावल्याची उदविग्न भावना प्रसाद तिवारी यांनी व्यक्त केली आहे.