Mumbai News: आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक; सांताक्रुझ येथील खळबळजनक घटना
आठ वर्षाच्या शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर येत आहे.
Mumbai News: मुंबई येथील सांताक्रुझ येथे धक्कादायक घटना घडली आहे. आठ वर्षाच्या शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे शाळेतील शिपायाने मुलीवर अत्याचार केले आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संतप्त पालकांनी गेल्या तीन दिवसांपासून शाळेच्या बाहेर आंदोलने केले आहेत. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. (हेही वाचा-विवाहबाह्य संबंधांत प्रेमी ने Intimate Photos ऑनलाईन शेअर केल्याने गृहिणी ने गळफास घेत संपवलं आयुष्य
मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे. संतप्त पालकांनी शालेय व्यवस्थापनांनी सुरक्षतेकडे दुर्लक्ष केल्याचे आंदोलनात सांगितले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पालकांना या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच सांताक्रुझ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी पश्चिम उपनगरातील एका शाळेत काम करणाऱ्या ३९ वर्षीय शिपायाला अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलीला शाळेच्या तळमजल्यावरील जिन्याच्या खाली असलेल्या स्टोअररुममध्ये घेऊन जायचा आणि तेथे अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचा. कंटाळून मुलीने या घनटेची माहिती पालकांना दिली. तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी शिपायावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्याच्या कलम 6 (अग्रॅव्हेटेड पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार), 10 (उग्र लैंगिक अत्याचार) आणि 12 (मुलावर लैंगिक छळ) तसेच भारतीय दंड संहितेच्या तरतुदी 376,377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि 506 असे कलम लादण्यात आले.