ED Action On Xiaomi: शिओमी कंपनीला ईडीचा धक्का 5,551 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

ईडीने केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये महाराष्ट्रातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले, अभिनेत्री जैकलीन फर्नांडीस यांच्यासह श्याओमी टेक्नोलॉजी इंडिया प्राइवेट लिमिटेड (Xiaomi Technology India Private Limited) या कंपनीवरही छापेमारी केली.

ED Action, Xiaomi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorat) अर्थातच ईडीने (ED) आज छापासत्रांची मालिकाच सुरु केली. ईडीने केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये महाराष्ट्रातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले, अभिनेत्री जैकलीन फर्नांडीस यांच्यासह श्याओमी टेक्नोलॉजी इंडिया प्राइवेट लिमिटेड (Xiaomi Technology India Private Limited) या कंपनीवरही छापेमारी केली. एकट्या श्याओमीवरील कारवाईबाबत बोलायचे तर या कंपनीची 5551.27 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. Xiaomi India चीनस्थित कंपनी Xiaomi ची संपूर्ण मालकी असलेली कंपनी आहे. या कंपनीचे बँक खाते जप्त करण्यात आले आहे. ईडीने शिओमी कंपनीची पाठिमागील फेब्रुवारी महिन्यापासून चौकशी सुरु केली होती. कंपनीने अवैध व्यवहार केल्याचा आरोप होता.

कंपनीने सन 214 मध्ये भारतात आपला व्यवसाय सुरु केला आणि 2015 पासून पैसे पाठविण्यास सुरु केला. कंपनीने तीन विदेशी संस्थांना 5551.27 कोटींच्या तुलनेत परकीय चलन पाठवले. ज्यात रॉयल्टीच्या आडून एक Xiaomi ग्रुपचाही समावेश आहे. रॉयल्टीच्या नावाखाली इथकी मोठी रक्कम त्यांच्या चीनी मूळ असलेल्या संस्थांच्या आदेशावर पाठविण्यात आली असा आरोप आहे. अमेरिकेच्या 2 संस्थांना ज्यांचा याच्याशी संबंध नाही. त्यांनाही पैसा पाठविण्यात आला. ज्याचा फायदा शेवटी Xiaomi समूहालाच झाला.

श्याओमी इंडीया, एमआय नावाच्या ब्रांडच्या माध्यमातून भारतात मोबाईल फोनचा व्यवसाय करते. Xiaomi India ही कंपनी पूर्णपणे भारतात उत्पादित केलेले मोबाईलसंच आणि इतर उत्पादनेही भारतातील निर्मात्यांकडून खरेदी करते. Xiaomi India ने त्या तीन विदेशी कंपन्यांकडून कोणतीही सेवा घेतली नाही ज्याना पैसे पाठवले. या समूहाची कंपनीमध्ये खोटी कागदपत्रे तयार करुन व्यवहार दाखविण्यात आले. विदेशात रॉयल्टीच्या आडून मोठ्या प्रमाणावर पैसे बाहेर पाठविण्यात आले. ईडीच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार फेमा कलम 4 चे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली. कंपनीने विदेशात पैसे पाठवताना बँकांना चुकीची माहिती दिली होती.