राज ठाकरे यांचे भाकीत खरे ठरले; पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'करुन दाखवले': मनसे
या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांन सरकारची कोंडी केली असतानाच मनसेने राज ठाकरे यांनी केलेले भाकीत प्रत्यक्षात उतरल्याचे म्हटले आहे.
Economic Slowdown 2019: राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एनडीए (NDA) प्रणीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्य नेतृत्वाखालील भाजप (BJP) सरकार यांच्या कारभारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे काय होईल याचे भाकीत केले होते. आज हेच भाकीत खरे होताना दिसत असल्याचा दावा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विद्यमान अवस्थेचा दाखला देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) केला आहे. हा दावा करताना राज ठाकरे यांनी 9 ऑगस्ट 2019 रोजी केल्या भाषणाचा दाखला मनसे (MNS) देत आहे. या भाषणात राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली होती.
देशाची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. सरकार विविध योजना प्रकल्पांच्या घोषणा करतं आहे. पण, सरकारकडे पैसा आहे कुठे? असा सवाल उपस्थित करत हे सरकार जवळ पैसै नसल्याने आता आरबीआयकडे पैसे मागत आहे. जे पैसे जेव्हा देश अडचणीत येतो अशाच वेळी आरबीआय बाहेर काढत असते. त्या पैशावर सरकारचा डोळा आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी 9 ऑगस्ट 2019 च्या भाषणात केला होता.
मनसेने ट्विट
दरम्यान, 9 ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी देशातील अनेक तरुणांना नोकऱ्या नाहीत. ज्यांना आहेत त्यांच्या नोकऱ्या जात आहेत. अनेक कामगारांना नोकरीवरुन काढून टाकले जात आहे. नव्या नोकऱ्या तयार होत नाही. या सर्व स्थितीला मोदी सरकारने घेतलेले नोटबंदी आणि जीएसटी हे दोन निर्णय कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. (हेही वाचा, कुणी नोकरी देतं का नोकरी? आर्थिक मंदी नोकरीच्या मुळावर; Automobile सेक्टरसह अनेक क्षेत्रात नोकरभरती मंदावली)
राज ठाकरे यांनी 9 ऑगस्ट 2019 रोजी केलेले संपूर्ण भाषण (व्हिडिओ)
दरम्यान, देशातील आर्थिक स्थिती सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून केंद्र सरकारने तब्बल 1 लाख 76 हजार कोटी रुपये घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. आरबीआय हे पैसे आपल्या लाभांश आणि अतिरिक्त राखीव निधीतून सरकारला देण्यास राजी झाल्याचेही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांन सरकारची कोंडी केली असतानाच मनसेने राज ठाकरे यांनी केलेले भाकीत प्रत्यक्षात उतरल्याचे म्हटले आहे.