Eastern Express Highway Traffic: वाहतूक कोंडीने गुदमरला पूर्व द्रुतगती मार्गाचा श्वास, ठाणेकरांचे हाल

रविवारची सुट्टी संपल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी ठाण्यातील चाकरमानी मुंबईच्या दिशेने कामावर निघाले असताना त्यांना हा मनस्ताप सहन करावा लागला.

Traffic प्रतिकात्मक छायाचित्र (Photo credits: PTI)

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पूर्व द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना हा नागरिकांना करावा लागत आहे. ठाण्यातील तीन हात नाका ब्रिज ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. टोल नाका आणि अवजड वाहनामुळे ही वाहतूक कोंडी झाली. या ठिकाणी वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं चित्र आहे. या वाहतुक कोंडीमुळे कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप हा सहन करावा लागत आहे. अनेकांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी यामुळे अनेकांना लेटमार्क देखील लागला आहे. (हेही वाचा - AI-Based Driving Tests: मुंबईसह राज्यात 16 शहरांमध्ये AI-आधारित ड्रायव्हिंग चाचण्या)

रविवारची सुट्टी संपल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी ठाण्यातील चाकरमानी मुंबईच्या दिशेने कामावर निघाले असताना त्यांना हा मनस्ताप सहन करावा लागला. पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरर लांबच लांब रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. टोल नाका आणि अवजड वाहनामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं अनेक वाहनचालकांनी सांगितलं. या वाहतूक कोंडीची माहिती मिळताच ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी तातडीने कोंडी सोडवण्याच्या सूचना दिल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif