9 फेब्रुवारी पासून पुणेकरांच्या दिमतीला E-Bus; पहा वैशिष्ट्यपूर्ण E-Bus कोणत्या मार्गावर धावणार, तिकीट दर किती?

25 ई बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanavis) यांच्या हस्ते होणार आहे.

Pune E Bus Service ( Image used for representational purpose | (Photo Credits: File Photo)

Pune E - Bus Service: पुण्यामध्ये अरुंद रस्ते आणि ट्राफिकच्या समस्येमुळे कार, स्कुटर अधिक प्रमाणात रस्त्यांवर असतात. यामुळे प्रदुषणाची समस्या वाढतेय त्यासोबतच सार्वजनिक वाहतुकीचीदेखील बोंब आहे. मात्र आता पुणे पालिका प्रशासनाने ई बस ताफ्यात आणल्याने पुणेकरांना गारेगार प्रवास अगदी माफत दरात आणि प्रदुषण कमी करणार्‍या वाहनांसोबत करता येणार आहे. पुण्यातील बहुप्रतिक्षित ई बस (E -Bus) सेवा 9 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. 25 ई बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanavis) यांच्या हस्ते होणार आहे.

काय असेल E-Bus चे बस भाडे?

पुण्यातील ई बस एसी म्हणजेच वातानुकुलित असली तरीही बसभाडं सामान्य बस इतकेच असणार आहे.

पुण्यात कोण-कोणत्या मार्गावर धावणार ई- बस ?

पुण्यात चार आणि पिंपरी चिंचवड येथे तीन अशा एकूण सात मार्गांवर ई बस धावणार आहे.

1. डांगे चौक ते हिंजवडी माण फेज 3

बस - 6

फेर्‍या - 96

दर 20 मिनिटांनंतर बस येईल.

2. आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा

बस - 2

फेर्‍या - 20

दर 45 मिनिटांनंतर बस येईल.

3. निगडी ते भोसरी

बस - 2

फेर्‍या - 48

दर 60 मिनिटांनंतर बस येईल.

4. हडपसर ते पिंपळे गुरव

बस - 3

फेर्‍या - 60

दर 30 मिनिटांनंतर बस येईल.

5. भेकराईनगर ते न. ता. वाडी

बस - 3

फेर्‍या-48

दर 45 मिनिटांनंतर बस येईल.

6. भेकराईनगर ते पुणे स्टेशन

बस - 3

फेर्‍या-54

दर 30 मिनिटांनंतर बस येईल.

7. हडपसर ते हिंजवडी माण फेज ३

बस -3

फेर्‍या - 18

दर 60 मिनिटांनंतर बस येईल.

कशा असतील इलेक्ट्रिक बस ?

पुणेकरांचा प्रतिसाद पाहता भविष्यात अधिक बस ताफ्यात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.