कोरोनाच्या संकटात शाळा संस्थापकांनी शुल्क वाढीसह भरण्याबाबत पालकांवर दबाव न आणण्याचे शाळांना अमित ठाकरे यांचे आवाहन
त्याचसोबत राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याबाबत विचार केला आहे. ऐवढेच नाही तर शाळा महाविद्यालये सुद्धा गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सर्वजणांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचसोबत राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याबाबत विचार केला आहे. ऐवढेच नाही तर शाळा महाविद्यालये सुद्धा गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद ठेवण्यात आल्या आहेत. याच दरम्यान आता एक नवा वाद उफाळून येत असून शाळांनी फी वाढीबाबतचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालकवर्गातून नाराजीसह संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी कोरोनाच्या संकट काळात शाळा संस्थाचालकांनी शुल्क वाढीबाबत किंवा शुल्क भरण्याबाबत दबाव आणू नये असे शाळांना आवाहन केले आहे.
काही दिवसांपूर्वीच शाळांनी पालकांवर फी भरण्याबाबत दबाव आणू नये या हेतूने काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. त्यानुसार शाळांनी पालकांना मासिक/त्रैमासिक फी जमा करण्याचा पर्याय द्यावा. फी वाढ करु नये आणि पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करुन फी मध्ये कपात करावी असे म्हटले होते. तरीही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडून या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. फी भरण्याबाबत पालकांवर शाळांना दबाव सुद्धा आणल्याने थेट मनसेकडे याबाबत तक्रार करण्यात आल्या आहेत.(Maharashtra Board 10th, 12th Results: राज्यातील इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा निकाल, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितला कालावधी, तारीख गुलदस्त्यातच)
याच कारणास्तव अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. अमित ठाकरे यांनी शाळांनी फी वाढ करत ती भरण्यासाठी दबाव आणू नये किंवा फी न भरल्यास पाल्याला काढून टाकले जाईल अशा धमक्या देण्यात आल्याचे म्हटले होते. त्यामुळे या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी खासगी शाळांच्या संस्थापकांसोबत बातचीत करुन याची दखल घ्यावी असे अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे म्हटले होते.