Maharashtra Board 10th, 12th Results: राज्यातील इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा निकाल, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितला कालावधी, तारीख गुलदस्त्यातच
Exam Results | (Photo Credits: Pixabay)

State Class X, XII Board Exam Results: कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सींग अशा अडचणींच्या फेऱ्यात अडकलेला इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परिक्षांचा निकाल कधी लागणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. विविध माध्यमांतून विविध तारखा आणि अफवा पसरवल्या जात होत्या. कधी ही तारीख तर कधी ती तारीख. अखेर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनीच SSC, HSC बोर्ड परिक्षा निकाल कधी लागणार याबाबत सांगून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. संभ्रम अद्यापही पूर्णपणे दूर झाला नसला तरी विद्यार्थी आणि पालकांना निश्चित माहिती मिळाली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Result) 15 ते 20 जुलै या कालावधीत जाहीर होईल. तर इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Result) 31 जुलैपर्यंत जाहीर होऊ शकेल. वर्षा गायकवाड यांनी निकाल कधी लागू शकेल याचा कालावधी सांगितला आहे. पण तारीख सांगितली नाही. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालक वर्ग, शिक्षक , शिक्षणसंस्था आणि एकूणच शैक्षणिक वर्तुळातील उत्सुकता कायम आहे. (हेही वाचा, ISCE, ISC बोर्डाचे निकाल आज दुपारी 3 वाजता होणार जाहीर; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा (View Tweet))

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटामुळे सरकारला लॉकडाऊन जाहीर करावा लागला. त्यामुळे पेपर तपासण्यासही भलताच विलंब लागला. त्याचा परीणाम निकाल लांबणीवर पडण्यात झाला. दरम्यान, इयत्ता 12 चा भूगोल या विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या विषयाचे गुणदाण इतर विषयांच्या सरासरी गुणांच्या आधारावर केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. यंदा इयत्ता बारावी परीक्षेसाठी 13 लाखांहून अधिक तर दहावीच्या परीक्षेसाठी 17 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.