Vegetables Price Increase: उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी; पालेभाज्यांच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ
पाणीसाठा कमी झाल्यामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर देखील झाला आहे.
देशासह राज्यातही सध्या उष्णतेच्या लाटेचा कहर पहायला मिळत आहे. या उष्णतेचा परिणाम हा देशातील पाणीसाठ्यावर पहायला मिळत आहे. पाणीसाठा कमी झाल्यामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर देखील झाला आहे. उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली असून, कांदा, शेवगा, घेवडा, मटारच्या दरात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. कोथिंबिर, मेथी, कांदापात, चुकाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. अन्य पालेभाज्यांच्या दरात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. (हेही वाचा - Onion Price Hike: निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव वाढले, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा)
राज्यात फक्त पुणे शहरात कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून प्रत्येकी एक हजार खोकी तोतापुरी कैरी, गुजरात, कर्नाटकातून मिळून 3 ते 4 टेम्पो कोबी, कर्नाटकातून 3 ते 4 टेम्पो घेवडा, पावटा 2 टेम्पो, तसेच बेळगावहून 2 टेम्पो भुईमुग शेंग, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून 5 टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून 4 ट्रक मटार, मध्य प्रदेशातून 10 टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली.
उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कोथिंबिर, मेथी, कांदापात, चुकाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. अन्य पालेभाज्यांच्या दरात 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर एक लाख जुडी, मेथीच्या 60 हजार जुडी अशी आवक झाली. किरकोळ बाजारात एक जुडी मेथी, कोथिंबिरीचे दर 20 ते 30 रुपयांपर्यंत आहेत.