Drunk Man Makes Hoax Call To Mumbai Police: मुंबई पोलिसांना मद्यधुंद व्यक्तीचा फोन, मुंबईत दहशतवादी घुसल्याचा केला दावा; आरोपीला अटक
या व्यक्तीने दारूच्या नशेत पोलिसांना फोन केला. लक्ष्मण ननावरे असे आरोपीचे नाव असून त्याने मुंबई पोलिसांना फसवा कॉल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Drunk Man Makes Hoax Call To Mumbai Police: मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला (Mumbai Police Control Room) रविवारी एका मद्यधुंद व्यक्तीने (Drunk Man) फोन केला. या व्यक्तीने दावा केला की, काही दहशतवादी (Terrorists) मुंबईत घुसले आहेत. कॉल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई केली आणि कॉलच्या संदर्भात तपास सुरू केला. मुंबई पोलिसांना तपासाअंती कॉलर दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. वृत्तानुसार, कॉलरने सांगितले की सुमारे दोन ते तीन दहशतवादी मुंबईत घुसले असून मानखुर्दमधील एकता नगर येथे आले आहेत. दहशतवादी काहीतरी योजना आखत असल्याची माहिती बनावट कॉलरने पोलिसांना दिली.
कॉलरने दिलेली माहिती चुकीची असून हा कॉल फसवा असल्याचे मुंबई पोलिसांना आढळून आले. या व्यक्तीने दारूच्या नशेत पोलिसांना फोन केला. लक्ष्मण ननावरे असे आरोपीचे नाव असून त्याने मुंबई पोलिसांना फसवा कॉल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (हेही वाचा - Mumbai 26/11 Attack: मुंबई हल्ल्याचा कट कसा रचला गेला? हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे काय झाले? वाचा सविस्तर)
आरोपी लक्ष्मण ननावरे याला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपींवर आयपीसीच्या कलम 182 आणि 505 (1) (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.