Nagpur News: नागपूर विमानतळावरून 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, कस्टम विभागाची कारवाई

राज्यातील नागपूर शहरातील विमानतळावरून कस्टम्स विभागाने ८ कोटी ८१ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे.

Drugs | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Nagpur News: राज्यातील नागपूर शहरातील विमानतळावरून कस्टम्स विभागाने 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. ही घटना 4 एप्रिल रोजी घडली. गेल्या काही वर्षांपासून ड्रग्जची तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहेत. त्यामुळे प्रत्येक शहरात या संदर्भात मोठमोठी कारवाई सुरु केली आहे. या बाबत सीमा शुल्क विभाग सतर्क झाले आहे. विमानतळावरून ड्रग्ज जप्त केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. हेही वाचा- व्हिडिओ पाहून एटीएममधून पैसे चोरण्याचा प्रयत्न,

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर विमानतळावरून कस्टम विभागाने 8 कोटीचे ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी एकाला अटक केले आहे. आरोपी हा तामिळनाडू येथील रहिवासी आहे. तो युगांडाहून दोहा मार्गे कतार एअरवेची फ्लाइट क्र. QR-590 ने गुरुवारी पहाटे नागपूर विमानतळावर उतरला. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर आधीच सापळा रचला होता. आरोपी हा ग्रीन चॅनलवरून जात असताना त्याला कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवल.अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली. त्याच्या जवळ तब्बल 2 किलो 937 ग्रॅम ड्रग्ज आढळून आले .

अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करत ड्रग्ज जप्त केले. 2 किलो 937 ग्रॅम ड्रग्ज हे आंतरराष्ट्रीय बाजाराच्या किमतीत 8 कोटी 81 लाख रुपयांचे आहे. आरोपीची सद्या चौकशी सुरु आहे. त्याकडे आणखी ड्रग्ज उपलब्ध आहेत याची चौकशी करत आहे. काही दिवसांपासून पुण्यात ड्रग्ज प्रकरण वाढत असल्यामुळे अधिकारी सतर्क झाले आहेत. गेल्या महिन्यात कस्टम विभागाने पुण्यातून 4 हजार कोटींचे ड्रग्ज आणि आरोपी संदिप धुंदियाला ताब्यात घेतले होते.