IPL Auction 2025 Live

Devendra Fadnavis On MVA: दुष्काळी मराठवाड्यातील जलप्रकल्पांना उद्धव ठाकरेंचे प्राधान्य नाही, देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

राज्यात 2014 ते 2019 पर्यंत भाजपची सत्ता असताना आमच्या सरकारने वॉटर ग्रीड प्रकल्पाला मान्यता दिली.

Devendra Fadnavis (Pic Credit - ANI)

भाजप (BJP) सरकारने सुरू केलेल्या सर्व जलप्रकल्पांची अंमलबजावणी राज्य सरकारने बंद केल्याने दुष्काळी मराठवाड्यावर संकट ओढवले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी केली. जालना जिल्ह्यात भाजपने आयोजित केलेल्या जल आक्रोश आंदोलनात फडणवीस बोलत होते. राज्यात 2014 ते 2019 पर्यंत भाजपची सत्ता असताना आमच्या सरकारने वॉटर ग्रीड प्रकल्पाला मान्यता दिली. मात्र महाविकास आघाडी सरकारने (MVA Government) हा प्रकल्प रखडवला आहे. जलयुक्त शिवार, सूक्ष्म सिंचन प्रकल्प यांसारखे जलसंधारणाचे चांगले प्रकल्पही बंद झाले आहेत. हेही वाचा  BEST च्या अ‍ॅप मध्ये येणार 'Home Reach' फीचर; महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्याचा प्रयत्न

MVA सत्तेत आल्यापासून सर्व लोकाभिमुख प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गाडी एकच धावतेय. फडणवीस म्हणाले. जालन्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी भाजप सरकारने 129 कोटी रुपयांचा निधी दिला होता, मात्र सरकार बदलल्यानंतर हे काम बंद पडल्याचे फडणवीस म्हणाले.