व्हिडिओ: पुणेकरांच काही खरं नाही, आगोदर होर्डिंग, आता थेट मेट्रोची भलीमोठी ड्रील मशीन भररस्त्यात कोसळली

पण, थोड्या थोड्या काळाच्या अंतराने घडणाऱ्या या विचित्र अपघातांमुळे पुणेकर मात्र संतप्त झाले आहेत. ताज्या अपघाताला पुणेकरांनी मेट्रोचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

Drill Machine | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

विचित्र अपघातांमुळे पुणेकरांच्या डोक्यावर सतत धोक्याची तलवार लटकलेली दिसते आहे. पुण्यात कधी माथेफिरु चालक लोकांच्या अंगावर बस घालून त्यांना चिरडतो. तर कधी चौकात सिग्नलसाठी थांबलेल्या पुणेकरांवर जाहिरातीचे होर्डिग कोसळते. आता तर हद्दच झाली. मेट्रोच्या कामासाठी (Pune Metro Project) जमीनीत खड्डे पाडणारी महाकाय ड्रिल मशीन (Drill Machine) भर रस्त्यात कोसळली. सुदैव म्हणून यात कोणाला दुखापत अथवा कोणती जीवितहानी झाली नाही. पण, थोड्या थोड्या काळाच्या अंतराने घडणाऱ्या या विचित्र अपघातांमुळे पुणेकर मात्र संतप्त झाले आहेत. ताज्या अपघाताला पुणेकरांनी मेट्रोचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

ड्रिल मशीन कोसळण्याची घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील नाशिक फाटा (Nashik Phata) येथे शनिवारी दुपारी घडली. ड्रिल मशिन कोसळण्याची घटना दुर्मिळ असली तरी, हा प्रकार कशामुळे घडला याबाबत मात्र माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. ज्या नाशिक फाटा येथे ही घटना घडली तो मार्ग मुंबई पुणे जुना महामार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरुन नेहमीच वाहतूक आणि वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बांधकाम, दुरुस्ती किंवा कोणत्याही प्रकारचे काम सुरु असताना योग्य काळजी घेणे अपेक्षित आहे. पण, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे पुणेकर सध्या असुरक्षिततेचा अनुभव घेत आहे. त्यांच्या सुरक्षेला जबाबदार कोण असा सवाल आता पुणेकर विचारु लागले आहेत. (हेही वाचा, पुणे: अनधिकृत होर्डिंग कोसळून २ ठार, ८ जखमी; परिसरात घबराटीचे वातावरण)

दरम्यान, घडलेला अपघात ही एक दुर्दैवी घटना आहे. यात कोणती जीवित किंवा वित्त हानी झाली नाही हे महत्त्वाचे. पण, असे असले तरी या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल. दोशींवर कारवाई केली जाईल. तसेच, यापूढे सुरक्षा नियमांचे पालन करत अधिक काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात येतील असे मेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif