मुंबईत CSMIA वर Gold Smuggling Racket मध्ये DRI ने केली दोघांना अटक; आरोपींमध्ये Air India Crew चा समावेश
Customs Act, 1962 अंतर्गत सध्या या प्रकरणामध्ये दोघांना अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे. magistrate’s court ने दोघांनाही शनिवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Mumbai zonal unit of the Directorate of Revenue Intelligence (DRI) कडून एअर इंडियाच्या एका पुरूष क्रू मेंबरला अटक करण्यात आली आहे. 1.41 कोटी रूपयाच्या सुमारे 1.373 किलोच्या परदेशी सोन्याची तस्करी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. DRI sources,च्या हवाल्याने HT ने दिलेल्या वृत्ता मध्ये शुक्रवार 13 जून दिवशी अमेरिकेच्या न्यूयॉर्कहून AI-116 फ्लाइटने आलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) उतरलेल्या या क्रू मेंबरला रोखण्यात आले. हा 42 वर्षीय व्यक्ती आहे. गिरीश पिंपळे असं त्याचं नाव आहे.
विशिष्ट गुप्तचर यंत्रणेच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती, ज्यात असे सूचित होते की एक सिंडिकेट एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सचा वापर करून अमेरिकेतून भारतात सोने तस्करी करत आहे. क्रू मेंबरच्या सुरुवातीच्या शोधात कोणतेही यश आले नसले तरी, सतत चौकशी केल्यावर असे दिसून आले की त्याने उड्डाणानंतर अनिवार्य ब्रेथअॅलायझर चाचणी दरम्यान बॅगेज सर्व्हिस एरिया जवळ सोन्याच्या बार असलेली एक थैली - काळ्या डक्ट टेपमध्ये गुंडाळून लपवली होती. यामध्ये 3 सोन्याचे बार आणि 3 कापलेल्या अवस्थेतील सोनं सापडलं आहे.
डीआरआय टीमने ती थैली जप्त केली, ज्यामध्ये 1.373 किलो तस्करीचे सोने होते. जबाबात, आरोपीने यापूर्वीही भारतात सोने तस्करी केल्याचे कबूल केले आहे. त्याच्या खुलाशाच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी पुढील कारवाई सुरू केली आणि तस्करी नेटवर्कच्या कथित सूत्रधाराला अटक केली. त्या व्यक्तीवर देशात बेकायदेशीर सोने आणण्यासाठी एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांचा वापर केल्याचा आरोप आहे आणि त्याने या प्रकरणात आपला सहभाग कबूल केल्याचेही म्हटले जाते. Customs Act, 1962 अंतर्गत सध्या या प्रकरणामध्ये दोघांना अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे. magistrate’s court ने दोघांनाही शनिवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2025 11:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

