Dress Code For Devotees in Tuljabhavani Temple: बर्मुडा, वनपीस, पॅन्ट शर्टधारींना नो एन्ट्री; तुळजा भवानी मंदिरात भक्तांसाठी ड्रेसकोड

मंदिर प्रशासनाने मंदिराबाहेर फलक लावून तशी माहिती देण्यात आली आहे. या फलकावर दिलेल्या माहितीनुसर बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे परिधान केलेल्या भक्तांना, नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही

Tuljabhavani (File Image)

Tuljabhavani Temple Dress Code: तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी आता चक्क ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने मंदिराबाहेर फलक लावून तशी माहिती देण्यात आली आहे. या फलकावर दिलेल्या माहितीनुसर बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे परिधान केलेल्या भक्तांना, नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिर संस्थेने जारी केलेही ही नियमावली वादाच्या भोवऱ्यात सापडू शकते. सध्या मात्र प्रसारमाध्यमांतून या निमावलीची जोरदार चर्चा सुरु आहे. मंदिरात दर्शनासाठी प्रवेशकरताना भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असा सल्लाही देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मंदिर परिसरात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात मोठा फलक आज म्हणजेच 18 मे पासून लावण्यात आला आहे. हा फलक लावताना मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सौदागर तांदळेव सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळी आदींचा पुजारी वर्गाकडून सत्कार करण्यात आल्याचे समजते. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांनी 'दर्शनाला येताना सभ्य पोषाखात यावे,' अशा आशयाचा लावला फलक)

स्त्री आणि पुरुषांसाठीही नियमावली

मंदिराबाहेर लावण्यात आलेल्या फलकानुसार मंदिर आवारात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शर्ट पॅन्ट आदीं वस्त्रे परिधान करुन प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे बंधन केवळ महिलांनाच नव्हे तर पुरुषांनादेखील लागू आहे. पुरुषांनाही शर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही, असे हा फलक सांगतो. ड्रेसकोडचे कडक नियम महिला आणि पुरुषांनाही पालावे लागणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif