Dr. Prakash Amte, Hairy Cell Leukemia मधून मुक्त; पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातून सुट्टी

ज्यामध्ये तुमची Bone Marrow खूप जास्त बी पेशी (lymphocytes) बनवते.

Prakash Amte | PC: Instagram

मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे (Dr. Prakash Amte) यांना 45 दिवसांच्या उपचारांनंतर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. जून महिन्यात आधी न्युमोनिया आणि नंतर रक्ताच्या कर्करोगाचं निदान झाल्याने प्रकाश आमटे रूग्णालयात दाखल होते. मात्र आता त्यांना केमोथेरपीनंतर घरी जाण्याची मुभा दिली आहे. प्रकाश आमटे यांचा मुलगा अनिकेत याने एक फेसबूक पोस्ट शेअर त्यांच्या आरोग्याची माहिती दिली आहे. सोबतच डॉक्टरांचे आभार मानले आहेत. यावेळी त्याने काही दिवस प्रकाश आमटे नागपूर जवळील अशोकवन प्रकल्पात आराम करतील असे सांगितले आहे.

प्रकाश आमटे यांना Hairy cell leukemia हा रक्ताचा कर्करोग झाला होता. आता ते Hairy cell leukemia मधून मुक्त झाले आहेत. नागपूरात ते परतणार असले तरीही त्यांना फार लोकांना भेटण्याची मुभा नसेल असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान हॉस्पिटल मध्येही प्रकाश आमटेंना भेटण्यासाठी गर्दी न करण्याचं आवाहन त्यांच्या मुलाने केले होते.

Hairy Cell Leukemia काय असतो?

Hairy Cell Leukemia हा रक्ताचा एक दुर्मिळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. ज्यामध्ये तुमची Bone Marrow खूप जास्त बी पेशी (lymphocytes) बनवते. हा एक प्रकारचा पांढरा रक्त पेशी जो संसर्गाशी लढतो. या अतिरिक्त बी पेशी असामान्य आहेत आणि सूक्ष्मदर्शकाखाली "केसांसारख्या" दिसतात.

प्रकाश आमटे 74 वर्षीय आहेत. बाबा आमटे यांचा समाजसेवेचा वसा ते पुढे चालवत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात लोक बिरादरी प्रकल्पात जवळपास 40 वर्षांपासून ते आदिवासी लोकांसाठी आपलं आयुष्य वेचलं आहे. या लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून नर्सरी ते इंग्लिश मीडियम पर्यंत शाळा, शासकीय आश्रम शाळा, अनेक गरजवंताना मोफत आरोग्य सेवा देत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif