मुंबई पोलिस गुन्हे शाखा करणार डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास

सिनियर डॉक्टरांच्या छळाला कंटाळून पायलने 22 मे दिवशी वसतीगृहामध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Dr Payal Tadvi Ragging & Suicide Case: मुंबईच्या नायर (Nair Hospital) हॉस्पिटलमध्ये शिकाऊ डॉक्टर पायल तडवीच्या (Payal Tadvi) रॅंगिंग आणि आत्महत्या प्रकरणाला आता मुंबई पोलिस क्राईम ब्रॅन्च युनिटकडे पाठवण्यात आलं आहे. पायल तडवीला तिच्या सिनियर डॉक्टर्सकडून जातिवाचक शेरेबाजीमुळे मानसिक छळ होत होता असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. आता पायलच्या वकिलांनी तिच्या अंगावर जखमा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता पायलची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन डॉक्टरांना अटक केली आहे. 31 मे पर्यंत त्यांना पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

ANI Tweet:

तडवी कुटुंबीयांनी मीडियाशी बोलताना नायर हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. सिनियर डॉक्टरांच्या छळाला कंटाळून पायलने 22 मे दिवशी वसतीगृहामध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.