Dr. Payal Tadvi Suicide Case: आरोपींविरोधी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल

मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील शिकाऊ डॉ. पायल तडवी (Dr. Payal Tadvi) आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. या प्रकरणात ज्या 3 महिला आरोपींना अटक करण्यात आली होती त्यांच्या विरोधात आज किंवा उद्या सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल होणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

Payal Tadvi (Photo Credits: Facebook)

मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील  शिकाऊ डॉ. पायल तडवी  (Dr. Payal Tadvi) आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. या प्रकरणात ज्या 3 महिला आरोपींना अटक करण्यात आली होती त्यांच्या विरोधात मुंबई गुुन्हेे शाखेने आज सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

नायर हॉस्पिटलमधील 26 वर्षीय शिकाऊ डॉक्टर पायल तडवीच्या कथित रॅगिंग आणि आत्महत्या प्रकरणानंतर वैद्यकीय क्षेत्रात सारेच सुन्न झाले होते. याप्रकरणी पायलला त्रास देणार्‍या भक्ती मेहेर (Bhakti Mehre), डॉ हेमा अहुजा (Hema Ahuja) आणि डॉ अंकिता खंडेलवाल (Ankita Khandelwal) तीन सिनियर डॉक्टर्सना मुंबईमध्ये अटक करण्यात आली होती.

हेही वाचा- Dr.Payal Tadvi Suicide Case: पायल तडवी हिच्या सुसाईट नोटमध्ये तिन्हीही आरोपी डॉक्टर्सच्या नावांचा खुलासा- वकिल गुणरत्न सदावर्ते

हॉस्पिटलमधील सिनियर महिला डॉक्टर्सकडून सातत्याने जातीवरुन बोलणी ऐकावी लागत असल्याने पायलने गळफास घेत 22 मे रोजी आपले जीवन संपवले. पायल तडवीने लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये जातीवरुन शेरेबाजी करत असल्याचा उल्लेख केला असून या प्रकरणातील आरोपी सिनियर डॉक्टर्सची नावांचाही खुलासा करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारत दंड संहितेच्या कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात केला.

आता यातील तिनही महिला आरोपींविरुद्ध आरोपपत्र  सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून पुढील प्रक्रिया सुरु आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now