डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची शंभर फुटांनी वाढविण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; अजित पवार यांची माहिती
या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. या वेळी अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकाची उंची वाढवण्यात येऊन ती 250 फुटांऐवजी 350 फुट करण्यात आली आहे. म्हणजेच या स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढवण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही. आगोदरच्या सरकारने काय केले, स्मारकाचे काम का रखडले याबाबत उणेदुणे न काढता स्पष्ट भूमिका घेत काम करण्यावर सरकारचा भर आहे, असेही अजित पवार म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार 15 जानेवारी 2015) पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. या वेळी अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले, 'खरं तर राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. परंतू, मुख्यमंत्री ठाकरे हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने मी ही माहिती देत आहे.' (हेही वाचा, सिंचन घोटाळा प्रकरण: राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर 13 फेब्रुवारीला होणार सुनावणी)
आज रोजी स्मारकाची उंची वाढविण्यासाठी आवश्यक असण्याऱ्या सर्व परवाणग्या केंद्र सरकारकडून प्राप्त झाल्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यावरही विस्तृत चर्चा झाली. त्यानुसार केंद्राकडून प्राप्त होणारी एकही परवानगी आता बाकी राहील नाही. त्यामुळे केंद्राची मान्यता नाही हे सांगण्याची वेळ सरकारवर येणार नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.