Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana: आता अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने वीज जोडणी उपलब्ध होणार, जाणून घ्या कसा घेता येईल लाभ

बासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Maharashtra Minister Nitin Raut (Photo Credits: ANI)

आता अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून दिली जाणार आहे, यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला असून, येत्या 14 एप्रिल ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ (Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार, या योजनेसंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. याशिवाय या योजनेत अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी, समस्यांचे निवारण करण्याबाबतच्या उपाययोजनांचाही समावेश असेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती जगभरात 14 एप्रिल 2021 रोजी साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्‍याच्या दृष्टीने वीज जोडणी कार्यक्रम बाबासाहेबांची जयंती ते पुण्यतिथी या कालावधीत राबविण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: मुंबईत लवकरच 5300 बेड आणि 800 आयसीयू बेड असलेले जम्बो कोव्हीड सेंटर उभारले जाणार)

असा घेता येईल लाभ –

याशिवाय, अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटित उद्योगांमधील वीज समस्यांचे प्राध्यान्याने निराकरण होण्याच्या दृष्टीने महावितरण स्तरावर प्रत्येक मंडळातील किंवा जिल्हास्तरावर अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यक्षेत्राकरिता कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे.