Mahaparinirvan Din 2020: सरकारच्या अवाहनास प्रतिसाद; आंबेडकरी अनुयायांची चैत्यभूमी दादर येथे गर्दी नाही

गर्दी होईल असे कोणतेच सण, उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यावर निर्बंध आहेत. हेच निर्बंध महापरिनिर्वाण दिनीही लागू करण्यात आले. ज्याला आंबेडकरी जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Chaityabhoomi Dadar (File Image)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2020) मुंबई येथील दादर चौत्यभूमी (Chaityabhoomi Dadar) प्रतिवर्षी भीम अनुयायांनी असोंडून जाते. लाखोंची गर्दी आणि 'जय भीम' हा नारा हजारोंचे स्फुल्लींग चेतावतो. प्रतवर्षी दिसणारे हे चित्र यंदा कोरोनामुळे दिसणार का? याबाबत उत्सुकता होती. परंतू, महाराष्ट्र आणि देशविदेशातील शेकडो भीम अनुयांनी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या अवाहनाला प्रतिसाद दिला. नेहमीच्या तुलनेत चैत्यभूमी येथे अगदीच अत्यल्प गर्दी पाहायला मिळत आहे.

यंदा कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारडून खबरदारी घेतली जात आहे. गर्दी होईल असे कोणतेच सण, उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यावर निर्बंध आहेत. हेच निर्बंध महापरिनिर्वाण दिनीही लागू करण्यात आले. ज्याला आंबेडकरी जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. (हेही वाचा, Mahaparinirvan Din 2020 Banner: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी Messages, Images द्वारे या महापुरुषास करा विनम्र अभिवादन)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राज्यभरातील इतरही अनेक आंबेडकरी नेते आणि समाजघटकांनी अवाहन केले होते. यात यंदा डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना घरुनच अभिवादन करावे असे अवाहन केले होते. त्यानुसार चैत्यभूमवीर गर्दी करणे आंबेडकरी जनतेने टाळले आहे.

दरम्यान, चैत्यभूमीवर होणारा शासकीय सोहळा, शासकीय मानवंदना, पुष्पवृष्टी आदींचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि मुंबई महापालिकेच्या समाजमाध्यमांतून (सोशल मीडिया) होणार आहे. ते केलेही जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif