Mahaparinirvan Din 2020: इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल- धनंजय मुंडे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन केले.

Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या आज महापरिनिर्वाण दिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. एप्रिल 2023 पर्यंत इंदूमिल (Indu Mill) येथील बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन केले.

धनंजय मुंडे यांनी आजच्या या महान दिनी दादरच्या चैत्यभूमीवर लाखो अनुयायी अभिवादन करण्यास येतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे अनुयायांनी सरकारला साथ देऊन येथे न जमल्याने त्यांचे देखील कौतुक केले. धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन सर्वांचे आभार मानले आहे.हेदेखील वाचा- Mahaparinirvan Din 2020 Chaityabhoomi Live Streaming: यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरबसल्या करा Online अभिवादन; येथे अनुभवा दादर चैत्यभूमी येथील लाईव्ह सोहळा (Video)

तसेच इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम वेगाने सुरु असून राज्य शासन त्याकडे दैनंदिन पद्धतीने लक्ष ठेऊन आहे. एप्रिल 2023 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची शिकवण आमच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारत अनेकांना या धर्माची दीक्षा दिली. दरम्यान भारतातील अनुसूचित जाती, जमातींच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सक्षम करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भरीव कामगिरी केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now