IPL Auction 2025 Live

Coronavirus: 'गाफील राहू नका', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नागरिकांना इशारा; कोरोना व्हायरस लसीवरही केले भाष्य

त्यामुळे जरी कोरोनावरील लस आली तरी त्याची इम्यूनीटी किती असेल, ती नागरिकांना कशी उपलब्ध होईल, यावर विचार सुरु आहे. तोपर्यंत नागरिकांनी हात धुणे, सोशल डिस्टंन्सींगचे पालण करणे, मास्क वापरणे या गोष्टींची काळजी घेणे आणि अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook Video)

कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लस (Coronavirus Vaccine) येणार. पण ती कधी येणार याबाबत निश्चिती नाही. जरी लस आली तरी त्यासाठी डिसेंबर महिना उजाडणार आहे. त्यामुळे येणारे काही महिने आपल्याला असेच काढावे लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. गाफील राहू नका, असा सूचनात्मक इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते पुणे (Pune) येथे सीईओपी कोव्हिड 19 रुग्णालयाचे (CEOP Covid 19 Hospital) उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

मुंबई पाठोपाठ पुणे येथेही कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणवार वाढत आहे. त्यामुळे पुण्यातही कोविड हॉस्पीटलची उभारणी करण्यात यावी अशी मागणी होत होती. या मागणीला प्रतिसाद देत पुणे येथे सीईओपी कोव्हिड 19 रुग्णालय उभारण्यात आले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) द्वारे या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे रुग्णालय केवळ 18 दिवसांत बांधून पूर्ण झाले आहे.

या वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील लोकसंख्या विचारात घेता ती साधारण 11 ते 12 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे जरी कोरोनावरील लस आली तरी त्याची इम्यूनीटी किती असेल, ती नागरिकांना कशी उपलब्ध होईल, यावर विचार सुरु आहे. तोपर्यंत नागरिकांनी हात धुणे, सोशल डिस्टंन्सींगचे पालण करणे, मास्क वापरणे या गोष्टींची काळजी घेणे आणि अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. (हेही वाचा, Jumbo COVID19 Hospitals In Pune: पुण्यातील पहिल्या जम्बो रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन)

जगभराचा अनुभव विचारात घेता, कोविडची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे जगभरातील कोरोना व्हायरस संसर्गाची संख्या वाढते आहे. अशा स्थितीत जंम्बो कोविड रुग्णालय, सेंटर्सची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर आहे. कोविड सेंटर्स आणि रुग्णांची संख्या यातील तफावत पाहता इतक्या मोठ्या सेंटर्सची आवश्यकता आहे का असे विचारण्यात येते आहे. काही लोक तसा प्रश्नही उपस्थितत करतात. मात्र, कोणत्याही स्थितीत गाफील राहून चालणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी सांगितले.