गॅस सिलेंडर दरवाढ : विना अनुदानित गॅस सिलेंडरही महागला, आजपासून LPG सिलेंडर 505.05 रुपये
आजपासून14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 50.58 आणि 5 किलोच्या सिलिंडरसाठी 25.29 रुपये वितरकांचे कमिशन असेल.
गोड-धोडाचा आणि आनंदाचा सण दिवाळी पार पडल्यानंतर आता लगेजच सरकारने सर्वसामान्यांना गॅस दरवाढीची कटू बातमी दिली आहे. दिवाळीपूर्वी विना अनुदानित आणि आता अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत वाढवली आहे. आता विना अनुदानित गॅससाठी २ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.नव्या दरानुसार सामान्यांना मुंबईमध्ये 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत सुमारे 505.05 रुपये मोजावी लागणार आहे.
सरकारने गॅस वितरकांचे कमिशन वाढवल्याने गॅस दरवाढ झाली . पूर्वी 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 48.98 रुपये आणि 5 किलोच्या सिलिंडरसाठी 24.20 रुपये आकारले जात असे. मात्र आजपासून14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 50.58 आणि 5 किलोच्या सिलिंडरसाठी 25.29 रुपये आकारले जातील. त्यामुळे दोन रुपयांची दरवाढ ग्राहकांना द्यावी लागणार आहे. दिवाळी तोंडावर आली असता सर्वसामान्यांना झटका; घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महागला
एकीकडे जागतिक बाजारात तेलाच्या किंमती कमी होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलाच्या दरामध्ये घसरण होत आहे. मात्र घरात गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने गृहिणींना घरखर्चाची गणितं पुन्हा करावी लागणार आहेत.