Dombivli Crime: मित्राला दारू आणायला पाठवून तरुणीवर सामूहिक अत्याचार
या प्रकरणी पोलिसांनी दिनेश याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र सुनिल अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहे.
डोंबिवली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सदर तरुणीच्या मित्राला दारु आणण्यासाठी पाठवून तरुणीवर दोघांनी अत्याचार केला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसानी दोघांपैकी एक आरोपी दिनेश याला अटक केली आहे. तर दिनेशचा साथीदार सुनिल याचा शोध पोलिस घेत आहेत. डोंबिवली पूर्वेतील कुंभारखान परिसरात पिडीत तरुणी तिच्या एका मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते. (हेही वाचा - Mumbai News: वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरुणाची अरबी समुद्रात उडी; नौदल, तटरक्षक दलाचे शोध मोहिम सुरु)
ती तिच्या राहते घर सोडण्याच्या तयारीत होती. तिने तिचे सामन तिच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. 17 सप्टेंबरच्या संध्याकाळी पिडीत तरुणी आणि तिचा मित्र हे तिचे सामान पाहण्यासाठी गेले असता. या दोघांच्या ओळखीचा दिनेश आणि सुनिल हे दोघे घरी होते. या दोघांनी पिडीत तरुणाच्या मित्राला दारु आणण्याकरीता सांगितले. तिचा मित्र दारु आण्यासाठी निघून गेला. तरुणी एकटीच घरी होती. याचा फायदा घेत दिनेश गडारी याने तरुणीवर अत्याचार केला.
या दोन्ही नराधमांच्या तावडीतून सुटून सदर तरुणी मदतीसाठी घराबाहेर निघून पळू लागली. तिचा पाठलाग करुन दिनेश याचा मित्र सनिल याने तिला एका रिक्षात कोंबून रिक्षात तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी दिनेश याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र सुनिल अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.