Dog Takes Mumbai Local: अजब कुत्रा, प्रवासासाठी वापरतो मुंबई लोकल, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया (Watch Video)
सोशल मीडियावर रोजच काही ना काही व्हायरल होत असते. कशा कशाची म्हणून दखल घ्यायची. पण, जेव्हा एखादी घटना, व्हिडिओ, छायाचित्र, प्रसंग, ट्रेन्ड सोशल मीडियावर व्हायरल होतो तेव्हा त्याची दखल घ्यावी लागते. आताही मुंबई येथील एका कुत्र्याचा व्हिडिओ (Dog Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा कुत्रा म्हणने मुंबईकरांप्रमाणेच शिस्तप्रिय आहे.
Mumbai Local Viral Video: सोशल मीडियावर रोजच काही ना काही व्हायरल होत असते. कशा कशाची म्हणून दखल घ्यायची. पण, जेव्हा एखादी घटना, व्हिडिओ, छायाचित्र, प्रसंग, ट्रेन्ड सोशल मीडियावर व्हायरल होतो तेव्हा त्याची दखल घ्यावी लागते. आताही मुंबई येथील एका कुत्र्याचा व्हिडिओ (Dog Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा कुत्रा म्हणने मुंबईकरांप्रमाणेच शिस्तप्रिय आहे. प्रवासासाठी ठरलेली मुंबई लोकल ट्रेन (Dog Takes Mumbai Local ) वापरतो आणि प्रवास करतो म्हणे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर नेटीझन्सनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा मानवाचा सर्वात जवळचा मित्र मानला जातो. कदाचित म्हणून तर अनेक डॉक्युमेंटरी, जाहिराती आणि अगदी बॉलीवूड चित्रपटांमध्येही ते कुत्र्यांवर चित्रीत झालेली दृश्ये दाखवली गेली आहेत. पण तुम्ही कधी कल्पना केली आहे का की कुत्रा त्याच्या प्रवासासाठी ट्रेनचा वापर करतो? नुकताच एक कुत्रा लोकल ट्रेनचा दररोज वापर करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. (हेही वाचा, Dog's Luxurious Wedding: कुत्र्याचं आलिशान लग्न, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केली 'अशी' कमेंट्स)
इंस्टाग्रामवर (Instagram) इंडिया कल्चरल हब (@India Cultural Hub) या पेजने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये, एक भटका कुत्रा, जो ट्रेनमध्ये नेहमीचा प्रवासी असल्याचा दावा केला आहे. कुत्रा मुंबई लोकलमध्ये शिरताना दिसत आहे. या क्लिपमध्ये त्याचा बोरिवली ते अंधेरी स्टेशनपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तो शांतपणे जमिनीवर बसलेला दिसतो, कोणालाही त्रास देत नाही. गोंडस अशा या क्षणाने अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांची मने जिंकली आहेत. कुत्र्याचा शिस्तप्रियपणा पाहून ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणारे लोकही आश्चर्यचकित होतात. तथापि, प्रवेशद्वाराजवळ उभे असलेले प्रवासी आपल्या प्रवासाचा आनंद घेत असलेल्या प्राण्याकडे पाहून हसताना दिसतात. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून, व्हिडिओला एक लाख लाईक्स आणि 8.3 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडिओ
व्हिडिओ पाहून एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने म्हटले आहे की, मला नक्कीच हे जाणून घ्यायचे आहे की बोरिवली स्टेशन आणि प्लॅटफॉर्मवरून ही ट्रेन किती वाजता आहे. जेणेकरून मी या छोट्याशा आनंदाला भेटू शकेन. दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, होय मी त्याला पाहिले आहे, तो रात्री अंधेरीला परत येतो, तो इतका हुशार बाळ आहे. आणखी एक वापरकर्ता म्हणतो की, कोणीतरी त्याला बोरिवली ते अंधेरी फास्ट ट्रेन पकडायला सांगा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)